Accident News: बंडू येवले: लोणावळ्यातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका तीन वर्षीय चिमुकल्याचा त्याच्याच वडिलांच्या कारच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे.

 

driving car..

हायलाइट्स:

  • दुर्दैवी बाप, मुलाच्या मृत्यूचं कारण ठरला
  • तीन वर्षीय चिमुकल्याने जीव गमावला
  • लोणावळ्यातील हृदयद्रावक घटना
लोणावळा: लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ऑर्चिड हॉटेलच्या पार्किंगमध्ये फोर्ड कार पार्क करताना बापाच्या कारखाली तीन वर्षीय चिमुकला आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रविवारी ८ जानेवारी रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

किआंश किरण माने (वय-३ वर्ष, रा. चिखली, सानेचौक, हवेली, पुणे) असे कारच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवीपणे मृत्यू पावलेल्या चिमुरड्या बालकाचे नाव आहे. तर किरण राजकुमार माने (वय-२८, रा- चिखली, सानेचौक, हवेली, पुणे) असे या दुर्घटनेतील वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी दिपक शिवाजी वारंगुळे (वय-२८, रा. आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास लोणावळा येथील जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या हॉटेल ऑर्चिडच्या समोर पार्किंगमध्ये किरण माने हे त्यांच्या जवळील फोर्ड इंडियार नंबर (एमएच-१४/ जेएच -९०००) गाडी पार्क करत असताना गाडीपुढे खेळणारा किआंश याच्या आंगावरून चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here