याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, त्यांना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास एक फोन आला. रामराई रोडवर एका संशयित चोराला मारहाण केल्याने तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे, अशी माहिती मिळाली. यावेळी गस्तीवरील पोलिस व्ही. एस. खंडागळे, चालक विजय दारुंटे आदीच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या अनिल गिरे, रमेश गिरे, संदीप गिरे, ऋषिकेश मोहन व इतर नागरिकांच्या मदतीने बेशुद्ध अवस्थेत शिरसाठ याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून सकाळी सहा वाजता मृत घोषित केले. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार सुनील म्हस्के हे करत आहेत.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या पसार आरोपीला जिन्सी पोलिसांनी गुरुवारी जयभवानीनगरातून अटक केली. याप्रकरणी २९ जून रोजी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सागर विक्रम केशभट्ट (वय २२, रा. बायजीपुरा), असे त्याचे नाव आहे. कैलासनगर स्मशानभूमीजवळ जुन्या भांडणातून योगेश देवीदास मुळे (रा. कैलासनगर) याला पाच जणांनी चाकू आणि फावड्याच्या दंड्याने मारहाण करत प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी मुळेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शुभम किरण शर्मा, अजय गात, सूरज गायकवाड, सुमित किरण शर्मा आणी सागर विक्रम केशभट्ट यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिन्सी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती, मात्र सागर केशभट्ट हा पसार झाला होता. सागर हा गुरुवारी जयभवानीनगर परीसरात आला असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, रफी शेख, संपत राठोड, शेख गनी, भाऊसाहेब जगताप, हारुण शेख, सुनील जाधव, गणेश नागरे, प्रवीण टेकले, ज्ञानेश्वर बावीसकर आणी जफर पठाण यांनी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times