Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Jan 2023, 10:31 pm
Pune News : पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता दाखवून दहशत माजवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातल्या मोबाईल मार्केटमध्ये चार जणांच्या टोळक्याने हातात कोयते फिरवत दहशत माजवली आहे.

हायलाइट्स:
- पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच
- मोबाईल मार्केट येथील तापकीर गल्लीत दहशत
- या घटनेने मोबाईल मार्केटमध्ये भीतीचे वातावरण
पुण्यातल्या मोबाईल मार्केट येथील तापकीर गल्ली येथून चार जण हातात कोयते घेऊन शिरले आणि स्थानिक दुकानदारांची दुकान फोडत कोयते फिरवत दहशत निर्माण केली. त्यानंतर ते तापकीर गल्लीच्या उत्तर दिशेला पळत सुटले या घटनेने मोबाईल मार्केटमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना आज जानेवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
“२१ व्या शतकातील कौरव हाफ पँट घालतात” राहुल गांधींचा आरएसएस भाजपवर हल्लाबोल, नोटबंदीवरुनही टीकास्त्र
घटनेच्या थोड्या वेळातच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या ठिकाणी पडलेला एक कोयता ताब्यात घेतला आहे. हे गुंड कोण होते? याचा तपास अजून लागलेला नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
द्विशतक ठोकलं पण तरीही इशान किशनला पहिल्या वनडेत स्थान का मिळणार नाही, जाणून घ्या…
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.