महिलांच्या या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. या अगोदरच्या जनता दरबारात जवळपास १५० महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेने पुणे जिल्ह्यात आपली ताकत वाढवण्यास सुरुवात केली आहे. या अगोदर खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या उपस्थितीत देखील पुणे जिल्ह्यातील महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. अनेक कार्यकर्ते देखील शिंदे गटात सामील होत आहेत.
राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्याने विकास कामे आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात आपण कटिबध्द असल्याचे देखील आढळराव पाटील नागरिकांना सांगत आहेत. याशिवाय ग्रामीण भागात असणाऱ्या संघटित महिला आणि त्यांच्या बचत गटांसाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून योजना राबविल्या जातील, असे आश्वासन देखील त्यांनी प्रवेशावेळी महिलांना दिले आहे.
शिंदे गटात आढळराव पाटील हे उपनेते असून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आढळराव पाटील देखील मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांना देखील त्यांनी पद वाटप केले असून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. एकूणच आढळराव यांच्या जनता दरबारात अनेक अनेकजण शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे शिंदे गटाची ताकत वाढण्यास मोठी मदत होणार आहे.