वाचा:
महिंद्रा यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटसोबत त्यांनी महापालिकेचा डॅशबोर्डही शेअर केला आहे. ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘कोविड १९ च्या साथीची सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या टप्प्यात चांगलीच सक्रिय होती. हा आजार व्यवस्थित हाताळला गेला. मधल्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यानं परिस्थिती काहीशी चिंताजनक झाली होती. महापालिकेची यंत्रणाही काहीशी आत्मसंतुष्ट दिसत होती. मात्र, नंतर वेगानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं,’ असं महिंद्रा यांनी म्हटलं आहे.
कोविडग्रस्त रुग्णांना खाटा उपलब्ध करून देणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि संसर्ग कमीत कमी होईल याची काळजी घेण्यावर महापालिकेचा भर आहे. येत्या काळात समूह संसर्गाचा धोका असल्यानं याशिवाय दुसरा पर्याय देखील नाही. मुंबईत अजूनही आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेड्सची गरज आहे. मात्र, पहिल्या पेक्षा परिस्थिती नक्कीच चांगली आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times