Farmers Protest: शेतमालाला दीडपट हमीभाव, देशव्यापी कर्जमुक्ती, जमीन अधिकार, वीज विधेयकसह इतर मागण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने 26 जानेवारी रोजी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. आंदोलनासंदर्भात महाराष्ट्रातील संयुक्त किसान मोर्चात सामील संघटनांची नुकतीच प्रा. एस. व्ही. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक झाली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात औरंगाबादसह मराठवाड्यातील छोट्या-मोठ्या अनेक शेतकरी संघटना (Farmers Association) देखील सहभागी होणार आहे. 

या बैठकीत शेतकरी खरीप हंगाम वाया गेल्याने संकटात सापडले आहेत. यंदा शेतकऱ्यांनी 1  कोटी 41 लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी केली होती. गोगलगाईचा प्रादुर्भाव, वाणी अळीचा हल्ला व अतिपाऊस यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकरी हैराण झाले होते. वाचलेल्या पिकांवर परतीच्या पावसाने आघात केला. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, पहिल्याच टप्प्यात राज्यातील 29  लाख हेक्टर पिके पावसाने मातीमोल केली. हे नुकसान पाहता राज्यभरात 40  लाख हेक्टर पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

विविध संघटनांनी आंदोलने करूनही सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला नाही. घोषणा केल्या मात्र अद्यापही मदत दिली नाही. दोनदा कर्जमाफी योजना राबविण्यात आल्या. मात्र, धरसोडीचे धोरण व जाचक अटी-शर्तीमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. पीक विमा योजना, जमीन अधिग्रहण, वन अधिकार, अन्न सुरक्षा, पेन्शन, शेतीमालाचे भाव दूध एफआरपी यासारखे प्रश्न महाराष्ट्रात तीव्र झाले आहेत,त्यामुळे या सर्व मागण्या लक्षात घेत देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

बैठकीत यांची उपस्थिती 

ऑनलाइन बैठकीला डॉ. अशोक ढवळे, प्रा. एस. व्ही. जाधव, हिरालाल परदेशी, उल्का महाजन, सुभाष काकुस्ते, सुभाष वारे, ब्रायन लोबो, डॉ. अजित नवले, राजन क्षीरसागर, राजू देसले, उमेश देशमुख, किसन गुजर उपस्थित होते. प्रतिभा शिंदे, मेधा पाटकर, किशोर ढमाले आदी सहभागी झाले होते.

live reels News Reels

मराठवाड्यातील नेत्यांचा सहभाग…

हरियाणामधील जिंद येथे 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांची भव्य महापंचायत घेऊन देशव्यापी आंदोलनाला सुरवात होणार आहे. ज्यात ट्रॅक्टर रॅली, मोर्चे, निदर्शने आयोजित करण्यात आले असून, यावेळी देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान यात औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक छोट्या-मोठ्या शेतकरी संघटना देखील सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी तयारी देखील करण्यात येत असल्याचे समोर आहे. त्यामुळे या देशव्यापी आंदोलनात मराठवाड्यातील नेत्यांचा सहभाग असणार आहे. 

Grape Farming: मराठवाड्यातील द्राक्षांना मिळतोय विक्रमी दर; काळी द्राक्षं 121 ते 130 तर साधी द्राक्षं 70 ते 80 किलो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here