Nashik News : सध्या नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात थंडीने (Cold) सर्वांनाच हुडहुडी भरली आहे. त्यामध्ये पशुपक्ष्यांना (Birds) देखील थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच नाशिकच्या इको एको फाउंडेशनने पशुपक्ष्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबवला आहे. पशुपक्ष्यांना थंडीपासून बचावासाठी हीटर ची व्यवस्था करण्यात आली आहे.

पशुपक्ष्यांचे रेस्क्यू ऑपरेशन तथा उपचार करण्यासाठी गेलाय काही वर्षांपासून इको एको फाउंडेशन (Echo Echo) नाशिकमध्ये कार्यरत आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी कारवाई जप्त झालेल्या केलेल्या पोपटांसह नायलॉन मांजामुळे जखमी घुबड्यांची वनविभागाच्या तात्पुरत्या उपचार केंद्रात देखभालीसह उपचार सुरू आहे. मात्र वातावरणीय बदलामुळे त्यांच्या सध्याच्या निवाऱ्यातही थंडीचा कडाका जाणवत आहे. नाशिकचा पारा आज सात अंशापर्यंत घसरल्याने नागरिकांसह पक्ष्यांना देखील थंडी जाणवत आहे. नागरिक स्वेटर, कानटोपी आदी थंडीपासून बचाव करणारे कपडे परिधान करत आहेत. मात्र पक्षांना देखील थंडीचा त्रास होत असल्याने पक्षांचा गारठयापासून बचाव करण्यासाठी उपचार केंद्रात हीटर लावण्यात आले आहेत. 

नाशिक पश्चिमवन विभागाच्या (Nashik forest) उंटवाडी येथील कार्यालयीन आवारात तात्पुरते उपचार केंद्र आहे. या ठिकाणी सध्या चार घुबडांवर आणि तीन देशी पोपटांवर उपचार सुरू आहेत. पोपट हे काही दिवसांपूर्वी वनविभागाने कारवाई जप्त केले होते, तर घुबडांना मांजामुळे इजा झाल्याने पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेसह व अधिकार्‍यांच्या निरीक्षणात उपचार सुरू आहेत. मात्र शहरात सध्या प्रचंड गारठा वाढल्याने इको एको फाउंडेशनतर्फे केंद्रात हीटर लावण्यात आले आहेत. यापूर्वीही गरजेनुसार तापमान नियंत्रणासाठी त्याचा वापर करण्यात आला आहे. मात्र सध्या बाहेरील वातावरणामुळे उपचार खोलीतही प्रचंड गारठा निर्माण झाल्याने दिवसरात्र पक्षांच्या हालचालींच्या नोंदी घेतल्या जात आहेत.

दरम्यान पक्षांना ऊब मिळावी म्हणून गवत पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. यासह अधिक प्रोटीन आणि फॅट्स विकता आहार दिला जात आहे. त्यामुळे पक्षांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बचाव करणे त्यांना शक्य होत आहे. उपचार खोलीचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला असून त्यासाठी रात्रंदिवस पक्षांच्या हालचालींची पाहणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या इको इको फाउंडेशनमध्ये उपचार सुरू असलेल्या पक्षांसाठी हीटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे पक्षांच्या उपचारामागची माणुसकी यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

live reels News Reels

पक्षी वन्यजीव उपचार केंद्रत असल्यावर 24 तास निरीक्षण केले जाते. खोलीतले तापमान स्थिर राहण्यासाठी हीटर चा वापर करीत आहोत. सध्या नाशिक सह जिल्ह्यातल्या तापमान घसरत असल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे पक्षांना सुरक्षित ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार तापमान 28 अंशपर्यंत स्थिर ठेवण्यात येत असल्याची माहिती इको एको फाउंडेशनचे सदस्य वैभव भोगले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here