नाशिक : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड केल्यानंतर देखील नाशिक ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, अनेक कार्यकर्तेही ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करत असल्याने नाशिकमधून ठाकरेंना सध्या धक्के बसत आहेत. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले आणि त्याच दिवशी नाशिकमधील ५० शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हा वाद सुरू असताना शिंदे गटात प्रवेश केलेल्या शिवसैनिकांने ठाकरे गटाच्या कार्यालयावर दावा ठोकला आहे. या शिवसैनिकांनी पत्रकार परिषदेत वडिलांच्या नावाचे अग्रिमेंट नावाने कार्यालयाचे अग्रिमेंट म्हणून दाखवल्याने आता नाशिकमध्ये ठाकरे गटासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे, आताच लक्षात घ्या काय आहे धोका…
संजय राऊत यांनी नाशिक दौरा केला यावेळी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेल्या शिवसैनिकांसह पदाधिकारी नेत्यांवर टीका केली. या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने काल नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी रुपेश पालकर या शिवसैनिकांना ठाकरे गटात खळबळ उडवणारा दावा केला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर भविष्यात कब्जा होऊ शकतो, असं सांगितले. त्यामुळे शिंदे गटाने नाशिकमध्ये ठाकरे गटाला भर थंडीत घाम फोडला आहे.

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाला गळती लागली असून डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दोन दिवसांचा नाशिक दौरा केला. संजय राऊत नाशिकमध्ये आले त्या दिवशी नाशकातील पन्नास पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांवर संजय राऊत यांनी निशाणा साधला. माध्यमांसमोर पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला होता. जे शिंदे गटात गेले आहेत त्यांना मी ओळखतही नाही असे सांगितले होते. यावर पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्यासोबतचे फोटो दाखवत पुरावे दिले होते.

दरम्यान, रुपेश पालकर याने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर दावा करत ‘शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात जे गेले त्यांना ओळखत नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावावर शिवसेना कार्यालय आहे. या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर दावा करणार असे ते म्हणाले आणि त्यांनी भर पत्रकार परिषदेत वडिलांच्या नावाने असलेले अग्रिमेंटच दाखवले. ठाकरे गटाचा मध्यवर्ती कार्यालयावर दावा केल्यानंतर नाशिकमध्ये ठाकरेंच्या गोठात एकच खळबळ उडाली. त्यामुळे आगामी काळात नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटात आता मोठा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आढळराव पाटलांचा ठाकरे गटाला मोठा धक्का, पुण्यात जनता दरबारात शिंदे गटाची हॅट्रिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here