प्रियकरानेच प्रेयसीच्या बहिणीच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना पालघरच्या तलासरीत घडली आहे. पोलिसांनी मुलाची सुटका केली असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मोबाईल लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

तलासरी पोलिसांनी दोन पथके नेमून या प्रकरणाचा तपास सुरू केला. फोन लोकेशन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणकर्त्याला अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर अपहरण झालेल्या मुलाला आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्रशासित प्रदेश सिल्व्हासा-खानवेल येथून ताब्यात घेतले व त्याला सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. राजेश धोदडे असे अपहरणकर्त्या आरोपीचे नाव असून तो एक युट्युबर आणि आदिवासी गायक असल्याचे कळते. तलासरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.