आंबेडकर पार्कात हा पुतळा उभारण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आग्रही मागणी केली जात आहे. मात्र, एकाच पार्कात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन पुतळे उभारण्याला आमदार अमित देशमुख यांनी विरोध दर्शवला होता. तरीही लातूरमधील आंबेडकरप्रेमी जनता याठिकाणी ७२ फुटी पुतळा उभारण्यासाठी आग्रही आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत यावरुन राजकारण तापण्याची दाट शक्यता आहेे.

 

Babasaheb Ambedkar
लातूरच्या आंबेडकर पार्कात गर्दी

हायलाइट्स:

  • आंबेडकर पार्कवर जमले शेकडो आंबेडकर प्रेमी
  • मनपा आयुक्तांना दिले मागणीचे निवेदन
लातूर: लातूरच्या डॉ. आंबेडकर पार्क येथे बाबासाहेबांचा ७२ फुटी पुतळा उभारण्यात यावा. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी आंबेडकरी प्रेमींमधून जोर धरु लागली आहे. त्यासाठी मंगळवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे शेकडो आंबेडकरप्रेमी जमा झाले होते. यावेळी जमलेल्या लोकांकडून डॉ. आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७२ फूट उंचीचा पुतळा उभारावा आणि त्यासाठी सरकारने निधीची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेबांच्या अस्थी अमरावतीत कशा पोहोचल्या? कॅप्टन छापानीमोहन यांनी सांगितला भावनिक किस्सा


शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे खा. सुधाकर शृंगारे यांचे सुपुत्र शंकर शृंगारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्लास्टिक ऑफ पॅरिसचा ७२ फूट उंचीचा पुतळा तात्कालिक उभारला होता. आंबेडकर जयंती झाल्यानंतर हा पुतळा सुस्थितीमधे काढून घेणे अपेक्षित होते. मात्र, हा पुतळा सध्या डॉ.आंबेडकर पार्कवरच असून त्याला प्लास्टिकने कव्हर करून ठेवले आहे. आता आंबेडकर प्रेमींनी महानगरपालिका आयुक्तांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७२ फूट उंचीच्या पुतळ्यासाठी निवेदन दिले आहे.
बाबासाहेबांच्या ‘या’ १० विचारांमध्ये आजही लाखो तरुणांचे जीवन बदलण्याची ताकद
शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथेही आंबेडकरी प्रेमींनी लातूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७२ फूट उंचीचा पुतळा उभा रहावा म्हणून हातात फलक घेऊन पाठिंबा दिला होता. तर नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७२ फूट उंचीचा पुतळा लातूर शहरातील डॉ. आंबेडकर पार्कवर उभारण्याची मागणी केली होती. पण आमदार अमित देशमुख यांनी या पुतळा उभारणीला विरोध दर्शवत एका पार्कवर दोन पुतळे हे कितपत योग्य असल्याचा सवाल उपस्थित केला होता. मात्र, अधिवेशन होऊन परतताच आंबेडकरीप्रेमींनी यावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. अस्मितेचा मुद्दा बनलेल्या या पुतळा राजकारणाचे पडसाद येत्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत न दिसले तरच नवल. त्यामुळे आता प्रशासन हा तिढा कसा सोडवणार, हे पाहावे लागेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here