Nashik NMC : नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik NMC) यांच्या आदेशाने कर वसुली विभागाने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात थेट कारवाई सुरू केली आहे.  रविवार ते शुक्रवार दरम्यान सहा दिवसांत 76 नळ कनेक्शन (Water Supply) बंद केले असून तब्बल  29 लाख 69 हजार 48 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. एकूण 241 ठिकाणी मनपाच्या पथकाने पाहणी केली. त्यातील 156 ठिकाणी वसुली करण्यात आली आहे. 57 लाख 96 हजार 471 लाख रुपयांपैकी 30 लाख रुपयांची वसुली झाली आहे.

नाशिक (Nashik) मनपाच्या कर विभागाने सहा दिवसांमध्ये सहा विभाग मिळून एकूण 47 वॉरंट काढले आहेत. त्यातून 11 लाख 84 हजार 486 रुपयांची वसुली झाली आहे. वॉरंट बजावल्यानंतर 21 दिवसाच्या आत मिळकतधारकांनी थकबाकीचा भरणा करणे अनिवार्य आहे. अन्यथा चालू बाजारभावाप्रमाणे मिळकतीचे मुल्यांकन करुन लिलाव प्रक्रिया सुरु केली जाईल, असा इशारा मनपाच्या कर विभागाने दिला आहे. दरम्यान थकबाकीदार, नागरिकांनी पाणीपट्टी, मालमत्ता कर त्वरित भरून नाशिक मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जे नागरिक कर भरून सहकार्य करणार नाहीत, अशा मालमत्ताधारकांचे पाण्याचे नळ कनेक्शन बंद करण्यात येईल. 

दरम्यान विभागनिहाय मालमत्ता वॉरंट देण्यात आले असून यामध्ये सातपूर विभागात 14, नाशिक पश्चिम -3, नाशिक पूर्व -4, नवीन नाशिक – 26 असे एकूण  47 वॉरंट देण्यात आले आहेत. थकबाकी आणि चालू वर्षाचा कर त्वरित भरून मनपाला सहकार्य करावे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपाच्या कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी केले आहे.

निमा कार्यालयाला वारंट

उद्योगांचे नेतृत्व करणारी नाशिक इंडस्ट्रिअल मन्युफॅक्चरींग असोसिएशन अर्थात निमा या संघटनेच्या कार्यालयाची एक लाख 27 हजार घरपट्टी थकली आहे. कर संकलन विभागाने या प्रकरणी निमा संस्थेला वारंट जारी केले असून थकबाकी भरण्यासाठी 21 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत भरणा न केल्यास  मालमत्तेचा लिलाव केला जाईल, असा इशारा दिला आहे.सातपूरमधील औद्योगिक वसाहतीचे असून अनेक नामवंत कंपन्या असून त्यांची लाखोंची मालमत्ता कर थकला आहे. त्यांना वारंवार आवाहन करुनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. अखेर करसंकलन विभागाने सातपूर विभागातील निमासह पंधरा जणांना वारंट जारी केले आहे. त्यात काही कंपन्या व काही उच्चभ्रू नागरिकांचा समावेश आहे. या पंधराजणांकडे तब्बल चाळीस लाख 87 हजार 418  इतका मालमत्ता कर थकला आहे. त्यांना दिलेल्या मुदतीत थकबाकी अदा न केल्यास मालमत्ता जप्त करुन तिचा लिलाव केला जाईल.

live reels News Reels

विभागनिहाय सहा दिवसांची वसुली 

नाशिक पश्चिम विभागात 81 नळ कनेक्शन बंद करण्यात आली असून 81 थकबाकीदारांकडून वसुली करण्यात आली आहे. दरम्यान या विभागात 11 लाख 95 हजार थकबाकी रक्कम असून यापैकी 10 लाख 31 हजार 419 रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर नाशिक पूर्व विभागात 8 नळ कनेक्शन बंद करण्यात आली असून 8 थकबाकीदारांकडून वसुली करण्यात आली आहे. दरम्यान या विभागात 11 लाख 27 हजार 726 थकबाकी रक्कम असून यापैकी 4 लाख 10 हजार 29  रक्कम वसूल करण्यात आली आहे. पंचवटी विभागात 0 नळ कनेक्शन बंद करण्यात आली असून 19 थकबाकीदारांकडून वसुली करण्यात आली आहे. दरम्यान या विभागात 3 लाख 32 हजार 998 थकबाकी रक्कम असून यापैकी 2 लाख 32 हजार 662 रक्कम वसूल करण्यात आली आहे. नवीन नाशिक विभागात 28 नळ कनेक्शन बंद करण्यात आली असून 14 थकबाकीदारांकडून वसुली करण्यात आली आहे.

दरम्यान या विभागात 9 लाख 31 हजार 559 थकबाकी रक्कम असून यापैकी 7 लाख 1 हजार 242 रक्कम वसूल करण्यात आली आहे. सातपूर विभागात 32 नळ कनेक्शन बंद करण्यात आली असून 28 थकबाकीदारांकडून वसुली करण्यात आली आहे. या विभागात 15 लाख 62 हजार 260  थकबाकी रक्कम असून यापैकी  5 लाख 33 हजार 906 रक्कम वसूल करण्यात आली आहे. नाशिकरोड विभागात 8 नळ कनेक्शन बंद करण्यात आली असून 6 थकबाकीदारांकडून वसुली करण्यात आली आहे.  या विभागात  6 लाख 46 हजार 928 थकबाकी रक्कम असून यापैकी  58 हजार 990 रक्कम वसूल करण्यात आली आहे. एकूण वसुल केलेली नळ कनेक्शन संख्या 156 असून यापैकी 76 नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. तसेच एकूण 57 लाख 96  हजार 471 रुपयांची थकबाकी असून यापैकी 29 लाख 69 हजार 048 रुपये वसूल करण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here