Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) सोयगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाने आत्महत्या केली आहे. तर तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून 30 वर्षीय प्रेयसीच्या विरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव प्रकाश बोराडे असे मयत तरुणाचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील भीमराव प्रकाश बोराडे हा पळसखेडा येथून जामनेर येथे क्रूझर जीपने शाळेतील मुलांची ने-आण करत असे. दरम्यान शनिवारी पळसखेडा ते वाकोद येथील आठवडे बाजारासाठी त्याने प्रवाशाची ने- आण केली होती.  त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता घरी परतल्यानंतर भूक लागली मी गावातून येतो, असे पत्नीला सांगून घराबाहेर गेला.

घरामधून बाहेर पडलेला भीमराव बोराडे घरी परतला नाही. रात्री उशिरा त्याच्या वडिलांना सांगण्यात आले की, मुलगा भीमराव याने एका घरी फाशी घेतली. यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्यानंतर पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. भीमराव यास जामनेर येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पळसखेडा येथे रविवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

तरुणीच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या… 

दरम्यान भीमराव याचे वडील प्रकाश शंकर बोराडे यांनी सोमवारी फर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, गावातील 30 वर्षीय तरुणीचे भीमरावसोबत प्रेमसंबंध होते. तिच्या त्रासाला कंटाळून भीमराव याने आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून या तरुणीविरोधत फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. 

live reels News Reels

Aurangabad Crime : औरंगाबाद दुहेरी हत्याकांडाने हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलीची हत्या

विवाहित महिलेची आत्महत्या 

तरुणाने प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोयगाव तालुक्यात समोर आली असतानाच, औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज महानगर परिसरात देखील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. काम करत असलेल्या कंपनीतील सुपरवायझर (Supervisor) सतत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. पतीने समज दिल्यावर देखील त्रास सुरूच असल्याने अखेर या महिलेने त्रासाला वैतागून आत्महत्या केली आहे. निकिता अनिल वाघमारे (वय 25 वर्षे, रा. वडगाव) असे मयत महिलेचं नाव असून,  इस्माईल पठाण (रा. साजापूर रोड, वडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here