अंगारकी चतुर्थी निमित्त जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी येतात. याच गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

jalna accident
जालना: अंगारकी चतुर्थी निमित्त जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी येतात. याच गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर येथून चार तरुण भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी मध्यरात्रीच्या दरम्यान निघाले. एकाच दुचाकीवर चौघेजण दर्शनासाठी गेले होते. रात्री पोहोचून त्यांनी राजुरेश्वराचे दर्शन घेतले. पण दर्शन घेऊन परत येत असताना पहाटे चारच्या सुमारास राजूर-भोकरदन रस्त्यावर असलेल्या टेपले पेट्रोल पंपसमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमध्ये चारही जण गंभीर जखमी झाले.
पाळीव कुत्रा चावला, संतप्त मालकिणीनं संपवलं; तलावात फेकायला गेली अन् भलताच प्रकार घडला
अंगारकी असल्याने पोलिसांचा बंदोबस्त चालू होताच. त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. चारपैकी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. निलेश हिरालाल चव्हाण (वय २० वर्ष) आणि प्रशांत आरके (वय २१ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अनिकेत बाळू वाहुळे (वय १९) आणि आरेफ सलीम कुरेशी (वय २२) दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्रथमोपचार करून सुरुवातीला जालना आणि जालना येथून औरंगाबाद येथे हलवले आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here