Pune G-20 : जी-20  (G-20) परिषदेसाठी शहरात कुठेही पूर्णपणे वाहतूक बंद राहणार नाही आहे. मात्र विमानतळ ते सेनापती बापट मार्गावर मेट्रोचं काम बंद राहणार आहे. आवश्यकतेनुसार शहरातील वाहतूकीत बदल करण्यात करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितलं आहे. यासोबतच पायाभूत माहिती देणारे दालनदेखील असणार आहे. ‘जी-20’  परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली आहे त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी  उत्तम समन्वय राखत ‘जी -20’ परिषदेचे आयोजन यशस्वी करावं, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

जी -20 परिषदेच्या निमित्ताने प्रतिनिधींच्या स्वागतासाठी तसेच शहर सौंदर्यीकरण आणि अनुषंगिक विकासकामांची तयारी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आहे अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी प्रशासनाचे कौतुक केलं. 37 देशातील 150 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार असल्याने सुरक्षाविषयक तसेच शिष्टाचारासंबंधी सर्व काळजी घ्यावी. पुणे, महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता, गुंतवणूकीची क्षमता संपूर्ण क्षमतेने प्रदर्शित करावी, असेही ते म्हणाले.

भरडधान्याचे खाद्यपदार्थ 

पाहुण्यांचे स्वागत, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठकीनिमित्त देण्यात येणारी प्रतिकात्मक भेटवस्तू, स्मृतीचिन्हे, लावण्यात येणारे प्रदर्शन स्टॉल, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरुपाची भोजनव्यवस्थ, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने भरडधान्याचे वैशिष्टपूर्ण खाद्यपदार्थ यासंदर्भात यावेळी माहिती देण्यात आली.

प्रतिनिधींसाठी शाही भोजन

पुणे विद्यापीठात 16 जानेवारी रोजी या पाहुण्यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणेरी ढोल पथक, महाराष्ट्राचे मर्दानी खेळ, लावणी जुगलबंदी, शिववंदना, गणेशस्तुती तसेच गोंधळ हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

live reels News Reels

 शहरात विविध कार्यक्रमाचं आयोजन

या परिषदेत लोकांचा सहभाग वाढावा, यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सायक्लोथॉन आणि स्वच्छचा मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं.

वेळेत कामं पूर्ण करा; महापालिका आयुक्त

पुण्यात जी-20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने शहरात वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी सुरु आहे. वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी काही मार्गावर सुशोभीकरण करण्यात येत आहे. रस्ते आणि पादचारी रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे. त्यासोबतच रस्त्यांवरील दिव्यांची पाहणी केली जात आहे. काही अंतराच्या कामासाठी नोडल अधिकारी नेमला आहे. त्यासोबतच यात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here