पहिल्यांदा लोक पवारांच्या विरोधात बोलायला घाबरायचे. पण लोक आता अजिबात घाबरत नाहीत. ते काही मोठे नाहीयेत, आपल्यामुळे ते मोठे झाले. तेव्हा घाबरु नका, मला पाठबळ द्या, त्यांना आपण राजकारणातून उखडून फेकू” अशी दर्पोक्ती पडळकरांनी केली. तो काय एवढा मोठा नेता नाहीये. त्याने बोलावं आणि मी उत्तर द्यावं, असं होणार नाही. कोण कुठला उपटसुंभ, त्याचं डिपॉझिट जप्त करुन मी त्याला पाठवलंय…, अशा शब्दात अजितदादांनी टीकास्त्र डागलं होतं.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलंय. पवार कुटुंबीय चोर आहेत. कृषी प्रदर्शनात पवारांनी शेतकऱ्यांना पैसे मागितले, असा गंभीर आरोप पडळकर यांनी केला. तसेच राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे पवार चोर आहेत, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना आज अजित पवार यांचा चांगलाच पारा चढला. तुम्ही ज्या माणसाबद्दल मला प्रश्न विचारताय तो काय एवढा मोठा नेता नाहीये. त्याने बोलावं आणि मी उत्तर द्यावं, असं होणार नाही. कोण कुठला उपटसुंभ, त्याचं डिपॉझिट जप्त करुन मी त्याला पाठवलंय…, अशा शब्दात अजितदादांनी टीकास्त्र डागलं.
होय आहे मी उपटसुंभ, तुम्हाला उखडून फेकणारच!
अजित पवार यांच्या याच टीकेला पडळकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. पवार कुटुंबियांना फोडून काढण्याचं मी काम करतोय. मला फक्त लोकांचं पाठबळ हवं आहे. प्रस्थापित नेत्यांना मेटाकुटीला आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यांना रडकुंडीला नाही आणलं तर माझं नाव गोपीचंद नाही, असं ते म्हणाले.
“लोकशाहीच्या माध्यमातून पवारांचं घराणं राजकारणातून उखडून टाकण्याचं काम मी हाती घेतलंय. पहिल्यांदा लोक पवारांच्या विरोधात बोलायला घाबरायचे. पण लोक आता अजिबात घाबरत नाहीत. ते काही मोठे नाहीयेत, आपल्यामुळे ते मोठे झाले. तेव्हा घाबरु नका, मला पाठबळ द्या, त्यांना आपण राजकारणातून उखडून फेकू” अशी दर्पोक्ती पडळकरांनी केली.
जनतेने इंदिरा गांधींना हरवलं, अजित पवार किस झाड की पत्ती!
पवार कुटुंबियांना मी पुरून उरलोय. त्यांना मी सळो की पळो करुन सोडलंय. त्यामुळे अजित पवार निरुत्तर आहेत. सतत डिपॉझिट जप्त केलं, असं सांगणं हा एक माज आहे. जनतेने इंदिरा गांधींना हरवलं, अजित पवार किस झाड की पत्ती, असा पलटवार पडळकरांनी अजितदादांवर केला. जनमाणसात प्रतिमा असणाऱ्यांवर मी बोलतो या अजित पवार यांच्या टीकेलाही पडळकरांनी उत्तर दिलं. “आमचं सरकार असतानाही मी लोकांमध्ये जातोय. बहुजनांना मी जागरुक करतोय. आतापर्यंत गैरसमजातून त्यांच्या अवतीभवती जे लोक होते त्यांना बाजूला करतोय, म्हणून अजितदादांचा तिळपापड होतोय”