Authored by किशोर पाटील | Edited by नुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Jan 2023, 4:48 pm

Jalgaon MAHAVITARAN News: वीजेच्या तारांचा स्पर्श होऊन एका कचरा वेचणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जळगावात खळबळ माजली आहे.

 

Jalgaon news

हायलाइट्स:

  • वीजेच्या तारांचा स्पर्श होऊन महिलेचा मृत्यू
  • कचरा वेचताना घडला धक्कादायक प्रकार
  • भावाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
जळगाव: चोपडा शहरातील वीज तारांमुळे विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती. या प्रकरणी सोमवारी मृत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनिता महेंद्र अहिरे (वय ३५ वर्षे रा. शेतपुरा चांभारवाडा, चोपडा) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

चोपडा शिवारातील हॉटेल जयेशच्या मागे महाराष्ट्र विद्युत वीज कंपनीच्या ११ के. व्ही विद्युत तारांचे जमिनी पासूनचे अंतर नियमापेक्षा कमी होते. महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कंपनी, चोपडा यांनी विद्युत संच मांडणीवर योग्य निगा, देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे सदर ठिकाणी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अनिता महेंद्र अहिरे या कचरा वेचत असताना जमिनीलगत आलेल्या विद्युत तारांचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा –कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज! कर्मचाऱ्यांना दिला ५० महिन्यांचा पगार बोनस

या घटनेस महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कंपनी, चोपडा याचे संबंधित अधिकारी आणि कमर्चारी जबाबदार असल्याची फिर्याद मयत महिलेचा चुलत भाऊ विजय अशोक खजुरे (वय ३१, रा. शेतपुरा, चोपडा) यांनी दिली आहे. त्यानुसार चोपडा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक संतोष पारधी हे करीत आहेत.

हेही वाचा –भयानक घटना; सहा वर्षांच्या मुलाने शिक्षिकेला थेट गोळी झाडली; कारण फक्त ऐवढच

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here