Maharashtra Politics Shiv Sena:  शिवसेना (Shiv Sena), निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची सुनावणी आजपासून निवडणूक आयोगासमोर (Election Commssion) सुरू झााली आहे. शिवसेना पक्षप्रमुख पदी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची करण्यात आलेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी केला. शिंदे यांची निवड जुलै 2022 ही राष्ट्रीय कार्यकारणीने केली आहे, त्यामुळे ही निवड योग्य असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. 

बाळासाहेबांच्या निधनानंतरचे बदल बेकायदेशीर

शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घेण्यात आलेले निर्णय, संघटनात्मक बदल हे बेकायदेशीर आहेत. शिवसेनेची जुनी घटना ही बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. शिवसेनेच्या घटनेत कोणताही बदल न करता पक्षप्रमुख म्हणून पद निर्मिती करण्यात आली असल्याचा दावा शिंदे गटाने केला. पक्षप्रमुख म्हणून राहण्याचा अधिकार ठाकरेंकडे नसल्याचा दावा शिंदे गटाने केला. 

शिंदे गटाचे वकील अॅड. मनिंदर सिंह यांनी सादिक अली प्रकरणाचा हवाला दिला. कायद्यानुसार, शिंदे गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले पाहिजे असा युक्तिवाद केला. निवडणूक चिन्हाबाबत तातडीने निर्णय झाला पाहिजे असा मुद्दाही त्यांनी मांडला. शिंदे गटाचे वकील अॅड. मनिंदर सिंह यांनी सादिक अली प्रकरणाचा हवाला दिला. कायद्यानुसार, शिंदे गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले पाहिजे असा युक्तिवाद केला. निवडणूक चिन्हाबाबत तातडीने निर्णय झाला पाहिजे असा मुद्दाही त्यांनी मांडला. अशिक्षित, गरीब मतदारांसाठी निवडणूक चिन्ह महत्त्वाचे असते. त्या माध्यमातून पक्षाचा प्रचार होत असतो, असा दावा अॅड. सिंह यांनी केला. 

शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्य बाण कोणाचा, याबाबतची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. सुनावणी आधीच दोन्ही बाजूने लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्रे आणि इतर कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहेत. त्यानंतर आज, सुनावणी सुरू झाली. शिवसेना ठाकरेंची की शिंदे यांची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

news reels

शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांच्यासह 12 वकिलांनी बाजू मांडली. तर, दुसरीकडे ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडत आहेत. 

ठाकरे गटाकडून 20 लाख सदस्यांचे अर्ज दाखल

पक्षावरील आपला दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Faction) 20 लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज  निवडणूक आयोगासमोर सादर केले आहेत. त्याशिवाय, ठाकरे गटाने सुमारे तीन लाख पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले. जिल्हा प्रमुखांपासून ते शाखाप्रमुख, गटप्रमुखांचा समावेश आहे.  तर, दुसरीकडे  मागील महिन्यात शिंदे गटाने 10 लाख 30 हजारांच्या आसपास प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. आणखी 10 लाख प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. 

मागील वर्षी, जुलैमध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना 50 लाख सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने प्रतिज्ञापत्रासाठीची मोहीम सुरू केली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here