मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं तिचं वास्तव्य असलेल्या टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत जीव दिला. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

आत्महत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही. मूळचे खरखोदाचे रहिवासी असलेले रोहित अग्रवाल शास्त्री नगरच्या गोल्डन टॉवरमधील फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. रोहित प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करतात. त्यांची मुलगी अवनी अग्रवाल मेरठ पब्लिक स्कूलमध्ये बारावीत शिकत होती.
पप्पांनी मम्मीला चाकू मारला, मग स्वत:ला मारुन घेतलं! चिमुकलीचा जबाब ऐकून पोलीस सुन्न
सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता अवनी स्कूटीची चावी, हेल्मेट आणि बॅग घेऊन घरातून निघाली. मात्र ती स्कूलमध्ये गेली नाही. टॉवरच्या छतावरून तिनं सव्वा दहाच्या सुमारास उडी घेतली. जखमी अवस्थेतील अवनीला कुटुंबीयांनी जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
वडिलांना न सांगता बोलेरो घेऊन गेला, डेंट पडला; बाबा ओरडले, लेकाने टोकाचे पाऊल उचलले
अवनीच्या आत्महत्येमागेचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोलिसांना अद्याप तरी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलीस अवनीच्या कुटुंबाशी, नातेवाईकांशी आणि मित्रांशी बोलून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. कौटुंबिक वाद, अभ्यासाचा ताण या दृष्टीकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here