गेल्या चार महिन्यांपासून देशभरात कमी-अधिक प्रमाणात टाळेबंदी आहे. वैद्यकीय सेवा, वैद्यकीय उपकरणे व औषध निर्मिती क्षेत्र वगळता जवळपास सर्वच व्यवहार ठप्प आहेत. अनेक उद्योगधंदे बंद आहेत. चार महिन्यांच्या बंदीचा मार न पेलवल्यानं अनेक छोटे उद्योग व्यवसाय कायमचे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा परिणाम थेट रोजगारावर झाला आहे. सेवा क्षेत्रातील उत्पन्नावर परिणाम झाल्यानं मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं वेळीच योग्य उपाययोजना न केल्यानं ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसचे नेते अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सातत्यानं मोदी सरकारला प्रश्न विचारत आहेत.
वाचा:
काँग्रेसचे अन्य नेतेही आता सरकारला लक्ष्य करत आहेत. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नव्या लूकचा संदर्भ देत त्यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. करोनाच्या काळात पंतप्रधान मोदींचा लूक वेगळा दिसत आहे. त्यांची दाढी वाढलेली आहे. त्याच लूकमध्ये ते माध्यमांना सामोरे जात आहेत. त्याच अनुषंगानं सातव यांनी एक खोचक ट्वीट केलं आहे. ‘दाढी मिशा तर कुणीही वाढवू शकतो, हिंमत असेल तर (सकल राष्ट्रीय उत्पन्न) व रोजगार वाढवून दाखवा,’ असा टोला त्यांनी हाणला आहे. त्यांच्या या ट्वीटची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे.
आणखी बातम्या:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times