Nashik Makar Sankranti : मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण तोंडावर आला असून नाशिक (Nashik) शहरातील एका कारखान्यात तिळगुळ बनवण्याची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे दरवर्षीच्या तुलनेत तिळाचे भाव चाळीस रुपये वाढल्यामुळे यंदा तिळगुळ देखील तिखट झाला आहे. 

मकर संक्रात म्हटली की प्रत्येक घराघरात तिळगुळ (Tilgul) हा बनवला जातो. मात्र हल्लीच्या धावपळीच्या युगात अनेकजण हे रेडिमेड तिळगुळाला पसंती देतात. अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांत आली असून यांना मोठ्या उत्साहात या सणाची तयारी सुरू आहे. मकर संक्रांतीला तिळगुळाचे वाटप केलं जातं. आणि याच तिळगुळ बनवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र तिळाचे दर वाढल्यामुळे तिळगुळाच्या लाडूतही 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नववर्षाचा पहिला सण अर्थातच मकरसंक्रांत आता अवघ्या काही दिवसांवर आला असून या पहिल्याच सणावर महागाईचं सावट बघायला मिळत आहे. तिळाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 रुपयांनी वाढ झाली असून तिळीने 200 चा आकडा पार केला असून 210 रुपये किलोवर ति जाऊन पोहोचली आहे. तिळाचे दर वाढल्याने साहजिकच याचा परिणाम तिळगुळाच्या लाडूवरही झाला असून लाडूही 20 ते 25 टक्क्यांनी महागले आहेत. गुजरातमध्ये तिळीचे उत्पादन घेतले जाते, सध्या मागणी वाढल्याने आणि त्या तुलनेत आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. हल्लीच्या धावपळीच्या युगात घरी लाडू बनवणं अनेक महिलांना शक्य होत नसल्याने रेडिमेड लाडू खरेदीला त्या अधिक पसंती देतात. 

दरम्यान मकर संक्रातीसह इतरही दिवशी गृहिणींमध्ये तिळाच्या लाडूची क्रेझ असते. त्यामुळे सर्व कुटुंबासह नातेवाईकांना तिळाचे लाडू भेट म्हणून दिले जातात. मात्र अनेकदा लाडू काहून काही केल्या पोट भरत नाही मग एक -दोन -तीन असे कितीचं लाडू आपण फस्त करून टाकतो. आजकाल बाजारात तिळगुळाचे लाडू सहज उपलब्ध असल्याने घरी तिळाचे लाडू बनवणे मुश्किलच होऊन बसते. यासाठी नाशिकच्या पेठ रोड परिसरात तिळगुळ बनवण्याची फॅक्टरीच असून या ठिकणी मोठ्या प्रमाणावर तिळगुळ बनवण्याचे काम सुरु आहे. जवळपास महिनाभरापासून ही तयारी सुरु असून यासाठी तीसहून अधिक महिला काम करत आहेत. येथील नंदवानी गृह उद्योग समूहाने तिळगुळासह शेंगदाणा चिक्की, मावा चिक्की, राजगिरा लाडू बनवले जात आहेत. 

news reels

नंदवानी गृह उद्योग समूह
नाशिक शहरातील पेठ रोड परिसरात नंदवानी गृह उद्योग समूह असून गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. बेबी नागरे यांच्या गृहउद्योगाच्या संचालिका आहेत. या कारखान्यात तिळगुळ, शेंगदाणा चिक्की, मावा चिक्की, राजगिरा लाडू बनवले जातात. जवळपास दिवसभरात दोनशे किलो तिळगुळ बनवले जातात. यासाठी 70 किलो शेंगदाणा, 70 किलो राजगिरा लाडूचा समावेश केला जातो. हा माल बनवल्यानंतर नाशिक शहरासह नांदेड, औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी ठिकाणी पाठवला जातो.  

असे बनवला जातो तिळगुळ 
तिळाचा लाडू बनविताना गुळाचा पाक तयार केला जातो, यामध्ये पाक उकळल्यावर राजगिराचे मिश्रण केले जाते, त्यानंतर याचा घाणा तयार केला जातो. हा घाणा घट्ट झाल्यानंतर त्याचे तुकडे करून गोल गोल तिळगुळ बनवले जातात. सद्यस्थितीत तिळगुळ 180 रुपये किलो असून 40 बॉक्स तयार केले जातात. तर शेंगदाणा चिक्की बनवतांना गूळ आणि साखर पाक तयार केला जातो. यात एक किलो शेंगदाणे टाकून पाकात मिश्रित केले जातात, त्यानंतर एका ट्रेमध्ये काढून ते पसरवले जातात, त्याच्या कटरच्या साह्याने वड्या पडला जातात. हा ट्रे दोन किलोचा असतो. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here