Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by जयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Jan 2023, 7:32 pm

Devashree Thokle: रेकॉर्डबुकमध्ये आपले नाव नोंदवण्यासाठी जगभरातील लोक अनेक अजब गोष्टी करतात. अशाच प्रकारची एक कृती करून मुलुंड येथील एका विद्यार्थिनीने गिनीज बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

 

Devasree Thokale
ठाणे : मुलुंड येथील एका विद्यार्थिनीने फक्त आपली जीभ नाकाला लावून विश्वविक्रम केला आहे. एका भारतीय विद्यार्थिनीने गिनीज बुकमध्ये आपल नाव नोंदवल्याने सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विश्वविक्रम करणारी ही विद्यार्थिनी फक्त १३ वर्षांची असून देवश्री अमर ठोकळे असे तिचे नाव आहे. देवश्री ही इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे.

Devasree

गिनीज बुक, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल नाव नोंदवण्यासाठी अनेक अवलिया अनेक तर्क वितर्क आणि संकल्पना लावून आपल्या कला कृती सादर करून आपल नाव नोंदवतात. मात्र मुलुंड येथील एका १३ वर्षीय विद्यार्थिनीने फक्त नाकाला जीभ लावून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. देवश्री अमर ठोकळे असे या १३ वर्षीय विद्यार्थीनीचे नाव असून तब्बल २२ मिनिट पेक्षा जास्त वेळ या विद्यार्थिनीने आपल्या नाकाला जीभ लावून ठेवल्याने तिचे नाव गिनीज बुक मध्ये नोंदवण्यात आले आहे. मात्र हा विश्व रेकॉर्ड केल्यानंतर देवश्रीच घरच्यांकडून तसेच तिच्या नातेवाईकांसह सगळ्याच स्तरातून कौतुक केले जात आहे.

वाचा- IND vs SL: विराट कोहलीचे विक्रमी शतक, श्रीलंकेविरुद्ध झळकावली ४५वी सेंच्युरी

Devasree

प्रत्येक लहान मुलांमध्ये काही ना काही अशक्य अस जगा वेगळे काहीतरी असल्याचे पाहायला मिळत. अस जगावेगळे काहीतरी देवश्री ही लहानपणापासूनच आपली जीभ नाकाला लावत होती. एकदा मॉल मध्ये आपल्या मुलीसोबत अमर ठोकळे हे फिरण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी एक पुस्तक चाळत असताना त्यांना एका व्यक्तीने ८ मिनिटे जीभ नाकाला लावून गिनीज बुकमध्ये नाव नोंदवल्याची माहिती वाचली. नाकाला जीभ लावून देखील एखादा व्यक्ती असा विश्वविक्रम करू शकत असल्याचे ठोकळे यांना लक्षात आले. ठोकळे यांची मुलगी देवश्री देखील अशाच पध्दतीने लहान पणापासून नाकाला जीभ लावत होती. हे ते पाहत होते, त्यातूनच त्यांनी सहज एकदा विचारले की? तु असे करु शकते का? त्यावर तीन तत्काळ होकार दिला आणि सवडीनुसार सराव करू लागली.

वाचा-ज्यांनी हलक्यात घेतले ते फसले; १० हजाराचे झाले १५ कोटी! एका निर्णयाने बदलले आयुष्य!

Devasree

देवश्रीने एकदा वडीलांना सांगितले की, बाबा मी जीभ लावू शकते ते देखील २१ मिनिटे हे ऐकूण ते देखील थक्क झाले. अवघ्या १३ व्या वर्षी तिने हे करुन दाखविले होते. त्यानंतर त्यांनी एक कॅमेरमन हायर केला, त्यानुसार तिचा व्हिडीओ शुट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर तिने तब्बल २२ मिनिटे जीभ नाकाला लावून ठेवल्याची त्यात नोंद झाली. त्यानुसार त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची माहिती दिली. त्यानुसार त्याठिकाणी देखील तिच्या विक्रमाची नोंद घेतली गेली. पुढे जाऊन युनिक बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन मधील वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डमध्येही तिच्या या कौशल्याची नोंद झाली. तसेच तिला प्रशस्ती पत्रक आणि मेडल देऊन तिला सन्मानित करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत पाच विक्रमांची नोंद तिच्या नावावर झाली आहे.

Devasree

पुढे जाऊन तिने याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र वयामुळे तिला याठिकाणी नाकारण्यात आले. आता त्याची तयारी आपण केलेली असल्याचे ती सांगते. यासाठी ती रोजच्या रोज याचा सराव करीत आहे. त्यात आता गिनीजमध्ये सध्या ५० मिनिटे एका व्यक्तीने जीभ नाकाला लावून ठेवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याची तयारी आता टप्याटप्याने सुरु केल्याचेही ती सांगते.

Devasree

असा देखील विक्रम होऊ शकतो, याचा खरच आनंद आहे मला. परंतु आता या विक्रमाची नोंद मला गिनीज बुकमध्ये देखील करायची आहे, त्यानुसार मी माझे प्रयत्न सुरु केले आहेत. नक्कीच मला त्यात यश मिळेल अशी आशा देवश्रीने व्यक्त केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here