वसई : 90 च्या दशकात आपल्या अदभुत कला कौशल्याने मिस्टर इंडियाला गायब करणारे प्रसिद्ध सिनेमॅफोटोग्राफर आणि स्पेशल इफेक्टसचे प्रदाते पीटर परेरा (Peter Pereira) यांचं आज पहाटे निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे आता कुणीही नाही. त्यांच्यावर वसईच्या पापडी चर्चमध्ये दुपारी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
सिनेसृष्टीत त्यांनी ‘बॉबी’ या सुपरहिट चित्रपटाचे छायाचित्रण केले होते. तसेच, शंभराहून अधिक चित्रपटांचं त्यांनी छायाचित्रण केलं होतं.
90 च्या दशकात ज्यावेळी आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती झाली नव्हती त्या काळात पीटर परेरा यांनी आपल्या फोटोग्राफी आणि स्पेशल इफेक्टसने अनेक चित्रपट रोमांचकारी बनवले होते. 1987 साली अनिल कपूरच्या मिस्टर इंडियाने सर्व प्रवेशकांना भुरळ तर घातलीच होती.
पीटर परेरा यांनी रोटी, अमर अकबर अँथोनी, मिस्टर इंडिआ, शेषनाग, अजूबा, लाल बादशाह, तुफान, शेहनशांह, कुली, मर्द, याराना, खिलाडीयों का खिलाडी, आ गले लग जा यांसारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे. तर मिस्टर इंडिया, शेषनाग, अजूबा सारख्या चित्रपटांना स्पेशल इफेक्टस पीटर परेरा यांनी दिलं होतं.
‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाशिवाय अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘अजूबा’ आणि सनी देओलच्या ‘बॉर्डर’ चित्रपटातही पीटर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पीटर यांचे वडीलही या उद्योगाशी संबंधित होते. पीटर यांनी मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे वडील जरी या इंडस्ट्रीशी निगडीत असले तरी बालपणी ते कधीही चित्रपटाच्या सेटवर त्यांच्याबरोबर गेले नव्हते. ते नोकरीच्या शोधात असतानाच ते चेंबूरच्या होमी वाडियाच्या बसंत स्टुडिओत रुजू झाले. तिथे त्यांना खूप काही शिकायला मिळाले. यातून ते कॅमेरा वापरायलाही शिकले.
पीटर परेरा यांच बालपण आणि शिक्षण वसईत झालं. पीटर यांच्या आई वडिलांचे वसईला घर आहे. चित्रपटाच्या कामासाठी पीटर मुंबईत स्थिरावले होते.
पीटर यांचं सामाजिक योगदान
पीटर परेरा यांनी अनेक सामाजिक संस्थांना मदतीचा हात दिला होता. वसई विकासिनी या संस्थेत त्यांनी स्वतःच्या नावाने आर्ट गॅलरी उभी करून दिली होती. त्यांच्या या निधनाबद्दल सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :