वाचा:
गपणतीसाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या लाखो चाकरमान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शेलार यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं आहे. चाकरमान्यांना कोकणात जाता यावे यासाठी लवकरात लवकर ठोस निर्णय घ्या. अन्यथा, ‘लालबागच्या राजा’च्या भक्तांप्रमाणेच कोकणी माणसाचीही बाप्पाशी ताटातूट होईल, असं शेलार यांनी पत्रात म्हटलं आहे.
वाचा:
कोकणातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध साधने व निधी याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होणार असताना अन्न, गरम पाणी, शौचालये व औषधांसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्याबाबत साधा विचारही करण्यात आला नाही किंवा बैठकही घेण्यात आलेली नाही. सरकारच्या या बेफिकिरीमुळं गावकरी आणि चाकरमानी यांच्यात दरी निर्माण झाली आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शेलार यांनी उपस्थित केलेले प्रश्न
१. १४ दिवस क्वारंटाइन व्हायचे झाल्यास ५ ऑगस्टपूर्वी चाकरमान्यांना कोकणात पोहोचावे लागेल. त्यासाठी लागणारे पास, वाहनांची सुविधा कशी व कधीपासून होणार? कधीपासून कधीपर्यंत प्रवासाला परवानगी असणार?
२. गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची रेल्वेची तयारी आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तसे स्पष्ट केले आहे. मग राज्य सरकारनं अजूनही रेल्वे गाड्यांसाठी मागणी का केली नाही?
३. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोफत अँटी बॉडी टेस्ट करून त्यांना प्रवासाची परवानगी का दिली जात नाही?
४. गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सरकारनं वेळीच निर्णय न घेतल्यानं लालबागचा राजा मंडळाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा न करण्याचा निर्णय घेतला. कोकणी माणसाचीही तशीच कोंडी करण्याची सरकारची इच्छा आहे का?
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times