IND v SL : कॅप्टन रोहित शर्माने आजच्या सामन्यात चांगलाच घोळ घातल्याचे पाहायला मिळाले. रोहितच्या या एका गोष्टीचा भारतीय संघाला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. शमीने श्रीलंकेच्या खेळाडूला आऊट केले होते. पण त्यानंतर रोहितने नेमका कोणता घोळ घातला आणि त्याचा भारतीय संघाला नेमका कसा मोठा फटका बसला आहे, जाणून घ्या….

रोहित यावेळी शमीजवळ गेला आणि या दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली. त्यानंतर शमीच्या चेहऱ्यावरील आनंद हा कमी झालेला पाहायला मिळाला. कारण रोहितच्या निर्णयाची नाराजी यावेळी शमीच्या चेहऱ्यावर दिसत होती. कारण रोहितने यावेळी शनाका बाद न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याने शमीला पंचांना सांगण्यास सांगितले. त्यानंतर शमी हा पंचांजवळ गेला आणि आम्ही अपील करत नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पंचांनी सामना पुढे सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण रोहितचा हा निर्णय भारतासाठी चांगलाच महागडा ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतरच्या चेंडूवर श्रीलंकेने एकेरी धाव घेतली आणि शनाका स्ट्राइकवर गेला. त्यावेळी शनाका हा ९८ धावांवर होता आणि त्याला जीवदान मिळाले. या जीवदानाचा चांगलाच फायदा शनाकाने उचलला. कारण त्यानंतरच्या पाचव्या चेंडूवर शनाकाने चौकार लगावला आणि आपले शतक पूर्ण केले. त्यानंतरच्या या सामन्यातील अखेरच्या चेंडूवर तर शनाकाने षटकार ठोकला आणि या जीवदानाचा चांगलाच फायदा उचलल्याचे पाहायला मिळाले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.