Nandurbar Weather News : सध्या राज्यातील तापमानात (Temperature) चढ उतार होत आहे. राज्यात कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला आहे. अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढल्यानं शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. नंदूबार जिल्ह्यात या वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना (Rabi Crop) फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा जोर वाढल्याचा परिणाम शेतीवरही होत असल्याचं चित्र दिसत आहे. नंदूरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गहू , हरभरा, रब्बी ज्वारी या पिकांवर थंडीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. त्वरीत उपाययोजना करण्याचे कृषी विभागानं आहवान केलं आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये कडाक्याचा थंडीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

हरभरा आणि गव्हावर रोगाचा प्रादुर्भाव

नंदूरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून तापमानाचा पारा घसरला आहे. तापमान 9 अंशाच्या खाली गेलं असून या वर्षातील सर्वात कमी तापमान आज नोंद झाली आहे. आज तापमान 7 अंश सेल्सिअसवर आहे. तापमान कमी झाल्यानं कडाक्याचा थंडीचा परिणाम जसा मानवी जनजीवनावर होत आहे तसा कमी झालेल्या तापमानाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसण्याची शक्यता आहे. कमी तापमानामुळं रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या गहू हरभरा आणि ज्वारी या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अति थंडीमुळं गहू पिकावर मावा किडीच्या प्रादुर्भाव तसेच तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर हरभऱ्यावर घाटे आळी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून हे वातावरण रब्बी हंगामातील पिकांवर होणाऱ्या बुरशीजन्य, आणि इतर किडजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागांचा मार्गदर्शनाखाली उपाययोजना करणे जरुरीचे आहे. रब्बी हंगामातील गहू आणि इतर पिकांवर पाहणी करून औषधांची फवारणी करावी असे आवाहन करण्यात आलं आहे.

पुणे, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून  कडाक्याच्या थंडीने उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच गारठला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर कडाक्याची थंडी पडली आहे. सध्या उत्तर भारत चांगलाच गारठला आहे. 

news reels

महत्त्वाच्या बातम्या:

Nagpur Weather Update : नागपूर 8.5 तर गोंदिया 7अंशांवर, विदर्भात आजही यलो अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here