Nashik Inspiring Woman : आज अवघ जग मोबाईलच्या (Mobile) आहारी गेलं आहे, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्रीचा गुड नाईटसुद्धा मोबाईलवरच होत आहे. त्यामुळे मोबाईल हा आयुष्यातील महत्वाचा भाग झाला आहे. अनेक वर्षांपासून मोबाईल वापरासंबंधी जनजागृती होत आली आहे. याच मोहिमेच्या नाशिकच्या (Nashik) 72 वर्षाच्या आजीबाई देखील उतरल्या आहेत. या आजीबाईंनी मोबाईल बाजूला ठेवायला सांगून वाचन वाढवण्यासाठी अनोखा प्रयोग राबविला आहे.

सध्या मोबाईल हा जीवनावश्यक वस्तू बनला असून मूलभूत गरजा असलेल्या अन्न, वस्त्र, निवारा यात मोबाइलचा सुद्धा समावेश झाल्यासारखं चित्र आपल्या सभोवताली पाहायला मिळतंय. मात्र या मोबाईलचे दुष्परिणाम अनेक घटनांमधून आपल्याला निदर्शनास येतात. यावर उपाय म्हणून नाशिकच्या ओझर जवळील भीमाबाई जोंधळे (Bhimabai Jondhale) या 72 वर्षीय आजीबाईंनी पुस्तकांच हॉटेल (Books Hotel) सुरू केलं आहे. होय पुस्तकांच हॉटेल दचकलात ना? 

नाशिक शहरापासून ओझर (Ojhar) जवळील दहावा मैल परिसरात जोंधळे आजी रिलॅक्स कॉर्नर हे हॉटेल चालवितात. मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणाईला पुस्तकांची गोडी लागावी, समाजात वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी जोंधळे आजीबाईनी आपल्या हॉटेलमध्ये चमचमीत जेवणासोबत अस्सल दर्जेदार पुस्तकांची देखील मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे काही दिवसांत नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रात पुस्तकांच हॉटेल नावारूपास आले आहे. आजीबाईंच्या या हॉटेलात बसल्यानंतर जणू लायब्ररीत बसल्याचा भास होतो. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी या अनोख्या लायब्ररीची मांडणी केली आहे. या उपक्रमात त्यांना त्यांचा मुलगा प्रवीण आणि सूनबाई प्रीती यांचीही मोलाची साथ मिळाली आहे. एका बाजूला ग्राहकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था तर दुसऱ्या बाजूला प्रशस्त लायब्ररी ग्राहकांच्या नजरेस पडते. त्याचबरोबर हॉटेलच्या भिंती नाशिकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देतात. 

पहिलं अन् शेवटचं पान सोडत नाही… 

news reels

मोबाईलमुळे जग मागे पडत चालले असून पुस्तक वाचन करणे आवश्यक आहे. 72 वर्षाची असूनही त्यांना अजून चष्मा नाही. मी जर पुस्तक वाचू शकते, तर प्रत्येकाने पुस्तक वाचायला हवं, अशी माझी इच्छा आहे. मोबाईलचा वापर कमी करायचा आणि पुस्तके वाचायची. बारा वर्षांपासून हॉटेल चालवत आहेत, गेल्या सात वर्षांपासून पुस्तक ठेवण्यास सुरवात केली. मेन्यूकार्ड कमी करून पुस्तकांची वाढ केली. ऑर्डर येईपर्यंत ग्राहकाने पुस्तक वाचलं पाहिजे. जर समाजाने पुस्तक हातात घेतले की, समाधान वाटते. पुस्तक चळवळ झाली पाहिजे, वाचनाकडे जगाचे लक्ष राहिले पाहिजे. त्यामुळे हॉटेलात पुस्तके मांडून ठेवले आहेत. गेल्या 23 वर्षांपासून पेपर एजन्सीचे काम करत असून पहिले आणि शेवटचे पान सोडत नाही अजूनही अशा भावना जोंधळे आजीबाई व्यक्त करतात. 

पिठलं भाकरी फेमस

भीमाबाई जोंधळे आजीबाईंनी अतिशय गरिबीतून दिवस काढले आहेत. भीमाबाई सांगतात की, 72 सालच्या दुष्काळात पुरेसं अन्न देखील खाण्यासाठी मिळत नव्हतं. त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. तेव्हा नाशिक शहर इतकं विकसित नव्हतं फार दुर्मिळ घर होती. शेतीत ही काही चांगल पिकत नव्हतं त्यामुळे काय करावं घर कस चालवाव असा प्रश्न माझ्यासमोर होता. तेव्हा मी या ठिकाणी एक छोटीशी चहाची टपरी सुरू केली, अन् आज भिमाबाईच्या हातची पिठलं-भाकरी चांगलीच फेमस आहे, त्या स्वतः बनवतात. नागलीच्या, बाजरीच्या भाकरी, झणझणीत पिठलं हे खवय्यांना त्यांच्या हातचं खूप आवडतं. अनेक जण बऱ्याच दूरवरून पिठलं-भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. त्या चुलीवर बनवत असल्याने त्याला एक वेगळीच चव असते त्यामुळे फेमस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here