Pune Crime News : लग्न समारंभात चोरीला गेलेले तब्बल (Crime) 26 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हिंजवडी पोलिसांनी जप्त केले आहेत. पुण्यातील नामांकित हॉटेलमधील लग्नसमारंभात वऱ्हाडी बनून आलेल्या चोरट्यांनी 65 तोळे सोने, 9 लाख रोख रक्कम लंपास केली होती.  याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रितीक महेश सिसोदिया (वय 20 वर्षे), वरुण राजकुमार सिसोदिया (वय 23 वर्षे), शालु रगडो धपानी (वय 28 वर्षे),शाम लक्ष्मीनारायण सिसोदिया (वय 38 वर्षे) सर्व राहणार मध्यप्रदेश अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील ऑर्किड हॉटेलमध्ये 6 डिसेंबर 2022 रोजी लग्न होते. यावेळी चोरट्यांनी या लग्नात तब्बल 65 तोळे सोने आणि 9 लाख रुपये रोख यांच्यावर हात साफ केला होता. पोलिसांनी हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आरोपींना पाहिले की दोन अनोळखी इसम हे फिर्यादीच्या आईची पर्स घेऊन गेले. पोलिसांनी कसून तपास चालू केला असता आरोपी हे मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील असल्याचे समजले. त्यानुसार हिंजवडी पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशमध्ये गेले तेथे त्यांनी तपासासाठी 17 दिवस वास्तव्य केले आणि सोनं जप्त केलं. 

सोनं चोरी गेल्याने लग्नात गोंधळ

लग्न सोहळ्यात उत्साहाचं वातावरण होतं. मात्र सोनं आणि पैसे सापडत नसल्याने कुटुंबियांना घाम फुटला. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जास्त असल्याने काही मिनिटात त्या समारंभात गोंधळ उडाला. वऱ्हाड्यांनी सगळीकडे शोधाशोध सुरु केली होती. मात्र सोनं आणि पैसे सापडत नव्हते. शेवटी कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. हिंजवडी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्हीद्वारे तपास केल्यानंतर ते चोरटे मध्यप्रदेश येथील असल्याचं गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी चोरांचा शोध घेतला. शोध घेण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये पोहोचले. 

पोलिसांची कमाल…

या सगळ्या आरोपींची माहिती मिळाल्यानंतर पोलीस थेट मध्य प्रदेशातील एका गावात पोहोचले. कडियासांसी असं या गावाचं नाव आहे. या गावात अनेक लोक चोरी करतात अशी माहिती आहे. हिंजवडी पोलिसांची टीम त्या गावात पोहचली. त्या गावातील लोकांनी पोलिसांना विरोध केला. त्यावेळी स्थानिक पोलिसांनी गोळीबार देखील केला होता. या सगळ्या प्रसंगाला सामोरं जात पोलिसांनी शिताफीने चौकशी केली. चोरांचा शोध घेतला. यावेळी मध्य प्रदेशचे स्थानिक पोलिसांचीही मदत झाली. 

news reels

संबंधित बातमीः

बायकोच्या घराच्या स्वप्नासाठी तो बनला चोर, 37 लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here