Dhule Agriculture News : शेतकरी (Farmers)आपल्या शेतात सातत्यानं नवनवीन प्रयोग करत भरघोस उत्पन्न काढतात. अलिकडच्या काळात शेतकरी योग्य नियोजन आणि बाजपेठांचा अभ्यास करुन पिकांची लागवड करत आहेत. धुळे (Dhule) तालुक्यातील न्याहळोद येथील एका शेतकऱ्यानं अॅप्पल बोरांची (Apples Ber) यशस्वी शेती करुन भरघोस उत्पन्न घेतलं आहे. कैलास रोकडे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची बोरं देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आणि कोलकात्याच्या बाजारपेठेत (Kolkata Market) दाखल झाली आहेत.

चिकाटी, जिद्द आणि योग्य नियोजनातून  कैलास रोकडे यांनी स्वप्न सत्यात उतरवलं आहे. कष्टातून त्यांनी अॅप्पल बोरांची शेती फुलवली आहे.  त्यांच्या बोरांना दिल्ली  आणि कोलकात्याची बाजारपेठ मिळाली असून भरघोस उत्पन्नातून त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग शोधला आहे. फळबाग शेतीचं योग्य नियोजन वेळोवेळी निगा खत फवारणीसह छाटणी केल्यावर आठ ते नऊ महिन्यात यातून चांगली फळे येण्यास सुरुवात होते. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडानुसार किमान 30 ते 50 किलो तर दुसऱ्या वर्षी प्रत्येक झाडाला 80 ते 120 किलो बोरांचे उत्पादन होत असल्याची माहिती कैलास रोकडे यांनी दिली. 

अॅप्पल बोरांना प्रति किलो सरासरी 15 ते 16 रुपयांपर्यंतचा दर 

देशी बोरापेक्षा अॅप्पल बोरांचे वजन हे सरासरी 60 ते 200 ग्रॅमपर्यंत भरते. विशेष म्हणजे अॅप्पल बोरांचे एक झाड सुमारे वीस वर्षे जगते. या अॅप्पल बोरांना स्थानिक बाजारपेठेत प्रति किलो सरासरी 15 ते 16 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. गेल्या वर्षी दिल्ली बाजारपेठेत हा दर सरासरी 20 ते 30 रुपये होता. त्यामुळं मोठा फायदा झाल्याची माहिती कैलास रोकडे यांनी दिली. या अॅप्पल बोरांच्या उत्पादनातून कैलास रोकडे यांनी इतर शेतकऱ्यांसमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे. 

news reels

अॅप्पल बोरांच्या शेतीतून 14 ते 15 लाखांचे  उत्पन्न 

कडधान्य आणि इतर पिकांचा खर्च जास्त असल्याने त्यातून उत्पन्न कमी आणि श्रम जास्त असल्यामुळं फळबाग लागवडीतून भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते असे कैलास रोकडे म्हणाले. अॅप्पल बोरांच्या शेतीतून 14 ते 15 लाखांचे तर दोन एकरात आवळा झाडांच्या लागवडीतून सरासरी अडीच ते तीन लाखांपर्यंत उत्पन्न घेतले आहे. तसेच त्यांनी नव्याने गोल्डन व्हरायटी सीताफळाची लागवड केली आहे.  त्यातून एक ते दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास त्यांना व्यक्त केला. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture Success Story : लाल केळीचा करमाळ्यात यशस्वी प्रयोग, लाखोंचं उत्पन्न; सिव्हिल इंजिनिअर तरुणाची यशोगाथा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here