Nashik News : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) सुधीर तांबेच्या विरोधात भाजपला (BJP) अद्यापही तुल्यबळ उमेदवार सापडत नाहीये. राज्यात सत्ता असताना देखील भाजपला उमेदवाराची शोधा शोध करावी लागत असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याआधीच विधानपरिषदेची निवडणूक चर्चेत आली आहे. 

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या (Nashik Padvidhar) निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख एक दिवसावर आली आहे. तरीही एकाही प्रमुख पक्षाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला नसल्याने तर्क वितर्क आणि चर्चाना उधाण आले, विजयाची हट्ट्रिक करणारे काँग्रेसचे सुधीर तांबेही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवसाचा मुहूर्त का साधत आहेत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून  आपल्या नावाची आधीच घोषणा झाली असून गुरुवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सुधीर तांबे यांच्या गोटातून संगितले जात आहे.. तर आपल्या भाजपककडून उमेदवारी लढविण्याचा अफवा कोणीतरी पसरवत आहेत.. माझे इतर पक्षातील; नेत्याशी चांगले सबंध आहेत. त्याचे गैर अर्थ काढू नका असं आवाहन सुधीर तांबे यांचे पुत्र  युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे.

सुधीर तांबे शड्डू ठोकून मैदानात उतरले असले तरीही समोर तुल्यबळ उमेदवार भाजपला सापडत नाहीये.  मागील पंचवार्षिकला राज्यात भाजपचेच सत्ता होती. तरीही तांबेंनी भाजपच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली होती. याहीवेळी भाजपाचीच राज्यात सत्ता आहे. तरीही उमेदवाराचे नाव घोषित होत नाहीय. त्यामुळेच वेगवगेळ्या नावाची चर्चा सुरु झालीय.. यात सर्वात आघाडीवर नाव आहे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांचे.. विखेंना उमेदवारी दिली तर नगर जिल्ह्यातील विखे थोरात कुटुंबातील राजकीय सामना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही बघायला मिळणार आहे. विखे सोबतच नगर जिल्ह्यातील धनंजय जाधव, धुळे जिल्ह्यातील धनराज विसपुते यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. 

धनंजय जाधव यांनी तर प्रदेशाध्यक्ष सकारात्मक असून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. धनंजय जाधव हे आधी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक होते, मात्र सध्या ते भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तर दुसरीकडे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी तीन नावं आहेत. मात्र अजूनही वेगळे नाव येऊ शकते असे म्हणत सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यानं सत्ताधारी पक्षाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. तर दुसरीकडे उमेदवारच नसल्यानं कोणता उमेदवार रिंगणात याची उत्सुकता तांबे समर्थकांना आहे.. त्यामुळे अवघ्या काही तासातच उमेदवाराची घोषणा होऊन निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे..

news reels

कोण आहेत धनंजय जाधव
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून धनंजय कृष्णा जाधव हे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांचे शिक्षण एलएलबी झाले आहे.  धनंजय जाधव हे 2008 साली वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक झाले होते. त्यानंतर 2014 -15 साली धनंजय जाधव हे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. धनंजय जाधव यांचे वडील कृष्णा जाधव आठ वेळा नगरसेवक राहिले आहेत. सध्या धनंजय जाधव यांच्या पत्नी सुप्रिया जाधव सध्या महापालिकेच्या प्रभाग 9 मध्ये काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. धनंजय जाधव हे आधी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक होते, मात्र सध्या ते भाजप खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

धनंजय जाधव यांच्या पाठोपाठ धुळे जिल्ह्यातील धनराज विसपुते यांनीही आपली दावेदारी सांगितली आहे.. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे निकटवर्ती अशी ओळख सांगणारे धनराज विसपुते आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन पदावर कार्यरत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सह संयोजक पदी देखील ते काम करीत आहेत….

कोण आहेत धनराज विसपुते..
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी धुळ्याचे धनराज विसपुते हे देखील इच्छुक उमेदवार आहेत. विसपुते यांचे शिक्षण एम एस्सी, जीडीसी अँड ए झाले आहे. विसपुते यांचा व्यवसाय हा शेती असून अनेक शिक्षण संस्थांवर ते विश्वस्त पदावर आहेत. विसपुते यांची राजकीय कारकीर्द पहिली असता 2017 साली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीवर त्यांची निवड झाली. धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीत आचारसंहिता प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. शासन सेवेतील इतर मागासवर्ग कर्मचारी आणि अधिकारी यांना पदोन्नती करिता जात वैधता पडताळणी आणि अट शिथिल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे निकटवर्ती म्हणून धनराज विसपुते यांची ओळख आहे. तसेच आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन या पदावर धनराज विसपुते सध्या कार्यरत असून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सहसंयोजकपदी देखील ते काम करीत आहेत. धनराज विसपुते यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती वनश्री पुरस्कार, स्वच्छता दूत पुरस्कार पनवेल महानगरपालिका, ऊर्जा व संवर्धन पुरस्कार महाराष्ट्र राज्य मेढा, रायगड गौरव पुरस्कार, शिक्षण महर्षी पुरस्कार ग्राम कन्या पुणे 2013… यासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे

 

1 COMMENT

  1. I’m pleased ɑbout the support I received from tһeir support staff.
    Ι give them 5 stars for thе work thеy’vе completed inn settling mу account.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here