Agriculture News : उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) तापमानात (Cold) मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे. याचा फटका नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgoan), धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक (Banana farmers) शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या केळी बागांची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केली गेली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे (Dhule), नंदुरबार जिल्ह्यात पन्नास हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर केळीचे पीक आहे. मात्र गेल्या तीन चार दिवसापासून उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली असून तापमान 7 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे .कडाक्याची थंडी केळी वरील करपा रोगासाठी पोषक असून अशा वातावरणात केळीच्या बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. 

थंडीच्या काळात किंवा इतरही दिवशी केळीच्या झाडावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. तर बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी केळीच्या पिकांमधील उष्णता कायम राहण्यासाठी पिकाला रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. त्याचे सोबत बागांमध्ये शेकोटी पेटवून धूर केल्यास तापमान कायम राहते, अशा प्रकारची काळजी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक पद्माकर कुंदे यांनी केले आहे. कमी तापमानात बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची मोठी शक्यता असते. कमी तापमानामुळे केळीचा फळाला तडे जाण्याची ही शक्यता असते. तापमान कमी असताना रात्रीच्या वेळेस बागांना पाणी दिल्यास बागांमधील तापमान कायम ठेवण्यास मदत होते. 

दरम्यान तापमान कमी झाल्यास बागांमध्ये शेकोटी करून बागेतील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. केळीचा पोंगा काळा पडत असेल तर आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी करावी. खोडालगत आच्छादन करावे. जेणेकरून कमी तापमानाचा मुळांच्या वाढीवर परिणाम होणार नाही. यामुळे करपा रोगावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. हा रोग सरकोस्पोरा मुसी बुरशीमुळे होतो. रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे केळीच्या खालील 4 ते 5 पानांवर सुरुवातीला लहान-लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके पडतात. हे ठिपके मोठे होऊन आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो. नियंत्रण :  फवारणी प्रति लिटर पाणीप्रोपीकोनॅझोल (25 ईसी) 1 मिलि किंवाका र्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) 1 ग्रॅम द्रावणात 1 मिलि स्टिकर मिसळावा.

news reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here