: हृदय विकाराचा झटका आल्यानं मृत्यूमुखी पडल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घडत आहेत. कार चालवताना, लग्न सोहळ्यात नाचताना हृदय विकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ओमानमधील मस्कटमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. बॅडमिंटन कोर्टवर खेळत असताना मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. २ जानेवारीला घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे.व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. खेळता खेळता तो अचानक जमिनीवर कोसळतो. त्याचे साथीदार असलेले खेळाडू त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्याची प्राणज्योत मालवते. बॅडमिंटन कोर्टमध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार रेकॉर्ड झाला. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?व्हिडीओमध्ये एक बॅडमिंटन खेळाडू त्याच्या मित्रांसोबत खेळताना दिसत आहे. तो पूर्णत: तंदुरुस्त वाटत आहे. त्याचं वय ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान वाटत आहे. त्याला शॉर्ट खेळताना कोणताही त्रास होत असल्याचं दिसत नाही. मात्र तो एकाएकी कोर्टवर कोसळतो. त्याच्या आसपास असलेल्या इतर खेळाडूंना काहीच कळत नाही. थकल्यामुळे जमिनीवर पडला असावा अशी त्यांची समजूत होते. द टाईम्स ऑफ ओमाननं दिलेल्या व्यक्तीनुसार, हृदयक्रिया बंद पडल्यानं संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तो मूळचा केरळचा रहिवासी होता. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. मृत व्यक्तीला खेळांची आवड होती. तो नियमितपणे क्रिकेट लीगमध्ये खेळायचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here