Leopard News Aurangabad: औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारात शेतात काम करणाऱ्या पिता-पुत्रावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) करून दोघांना ठार केल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. आता त्याच आपेगाव शिवारात पुन्हा सोमवारी बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान एका शेतकऱ्याने या बिबट्याचे छायाचित्र आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद देखील केला आहे. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सद्या ग्रामीण भागात रब्बीच्या हंगामाची कामे सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी दिवसभर शेतात काम करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान आपेगाव शिवारातील शेतकरी प्रवीण औटे यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरु असल्याने ते शेतात गेले होते. दरम्यान त्यांना शेतात बिबट्या बसलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत कोणाला सांगण्याच्या आधीच बिबट्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात निघून गेला. मात्र प्रवीण औटे यांनी त्याचा फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. तर वनविभागाकडून बिबट्याचा पायाचे ठसे किंवा इतर गोष्टींची पाहणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…

news reels

आपेगाव आणि परिसरात ऊसाची मोठ्याप्रमाणावर लागवड केली जाते. त्यामुळे याचाच फायदा लपण्यासाठी बिबट्याला होते. दरम्यान सद्या शेतांमध्ये मोठ्याप्रमाणावर कामे सुरु आहे. काही ठिकाणी ऊस तोडणी सुरु आहे. तर काही ठिकाणी ऊसाची लागवड करण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी कापसाची वेचणी सुरु आहे. सोबतच तुरीची सोंगणी सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे. मात्र शिवारात बिबट्या दिसल्याचं कळताच गावात दहशतीचे वातवरण पसरले आहे. तर शेतात असलेली कामे देखील कोलमडली आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. 

गेल्यावर्षी घेतला होता पिता-पुत्राचा बळी… 

वर्षभरापूर्वी देखील आपेगाव शिवारात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला होता. तर 15 नोव्हेंबर 2020 रोजी आपेगाव शिवारात गोदावरी काठालगत असलेल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या कृष्णा औटे व अशोक औटे या पिता-पुत्रावर बिबट्याने हल्ला केला होता. या दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण होते. मात्र काही दिवसांनी करमाळा येथे हा बिबट्या ठार केल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. पण आता पुन्हा एकदा बिबट्या दिसून आल्याने गावकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक आकडेवारी! गेल्यावर्षी मराठवाड्यातील तब्बल एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here