फेसबुक लाईव्हदरम्यान हमादानं आपण घर सोडणार नसल्याचं म्हटलं. ‘जोपर्यंत टीव्ही चॅनल त्यांच्या पत्रकाराला पाठवत नाहीत, तोपर्यंत मी घर सोडणार नाही. मला माझी परिस्थिती सांगायची आहे. मी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं ते मला सांगायचं आहे. मी माझ्या तीन मुलींसाठी हे सगळं केलं. मला त्यांच्यासोबत राहायचं आहे. कोणालाच माझी दया आली नाही. वृत्तवाहिनी जोपर्यंत त्यांच्या प्रतिनिधींना इथे पाठवत नाहीत. जोपर्यंत मी माझी बाजू मांडत नाही, तोपर्यंत मी घर सोडणार नाही,’ असं हमादा लाईव्हदरम्यान म्हणाला.
हमादानं हत्येच्या घटनेचं फेसबुकवरून लाईव्ह प्रक्षेपण सुरू केलं. हा प्रकार तिरा गावातील काहींनी पाहिला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथला प्रकार पाहून पोलीस हादरले. हमादा पत्नीच्या मुंडक्याशेजारी बसला होता. त्यानं तीन मुलींना ठार मारण्याची धमकी दिली. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला रोखलं आणि अटक केली.
हमादा अगोजच्या लग्नाला ९ वर्षे झाली असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली. अगोज सातत्यानं वाद घालायचा. अनेकदा मारहाण करायचा. त्यामुळे पत्नी त्याच्यापासून वेगळी राहू लागली. दोन वर्षांपासून दोघे वेगळे राहत होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यातील वाद मिटला. पत्नी घरी परतली होती.