Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिसांकडून (Aurangabad City Police) 2022 वर्षातील गुन्ह्यांचा वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या अहवालात गेल्या वर्षभरात तब्बल 43 खुनाच्या (Murder) घटना घडल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच खुनाचा प्रयत्न करण्याच्या 48 घटना घडल्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 2022 वर्षे औरंगाबाद शहरातील खुनाच्या घटनांनी गाजले आहे. विशेष म्हणजे खुनातील सर्व 43 गुन्हे पोलिसांनी उघड केली असून, आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

गुन्ह्यांची 2022 आकडेवारी…
अ.क्र. गुन्ह्याचा प्रकार  दाखल  उघड 
1 खून  43 43
2 खुनाचा प्रयत्न  48 47
3 सदोष मनुष वध  03 03
4 बलात्कार  99 99
5 दरोडा  06 06
6 दरोड्याचा प्रयत्न  03 03
7 जबरीचोरी  132 107
8 घरफोडी  138 50
9 सर्व चोऱ्या  1418 553
10 गर्दी मारामारी  131 130

या’ तीन खुनाच्या घटनांनी शहर हादरलं!

  • एकतर्फी प्रेमातून हत्या…

21  मे 2022  रोजी दुपारी दोन वाजता शहरातील रचनाकर कॉलनी येथील प्लॉट नं. 28 च्या, मोकळ्या जागेवर देवगीरी महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन मुलगी सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश (वय 18 वर्षे रा. घर नं.5-182 उस्मानपुरा गुरुव्दारा समोर औरंगाबाद) हिच्यावर एकतर्फी प्रेमातुन आरोपी शरणसिंग सविंदरसिंग सेठी (वय 20 वर्ष, रा, भिमपुरा, उस्मानपुरा, औरंगाबाद) हल्ला केला होता. तु माझ्यावर प्रेम का करत नाही या कारणावरुन आरोपीने सुखप्रीतच्या गळयावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी करुन ठार मारले होते. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अविनाश आघाव व SIT पथकाने तपास करुन आरोपी विरुध्द भौतिक पुरावे (Physical Evidence), डिजीटल व तांत्रिक (Techanical & Digital Evidence) तपास संदर्भिय पुरावे, न्यायसहायक वैद्यकीय (Forensic Medician Evidence) न्यायसहायक वैज्ञानिक पुरावे (Forensic Scientific Evidence/ DNA Porofiling Report), तज्ञांचे अभिप्राय (Expert Opinion), गुन्हा करणेकामी वापरलेले हत्यार खंजीर हस्तगत करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. 

news reels

  • पत्नीकडूनच पतीची हत्या… 

दुसऱ्या घटनेत बेगमपुरा पोलीस ठाणे हद्दीत जळालेल्या अवस्थेत असलेला अनोळखी मृतदेह सापडला होता. यावेळी मृतदेहाची ओळख पटवणे अशक्य होते. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे बेगमपुरा यांनी समांतर तपास केला. जळालेल्या अवस्थेत असलेला अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मयताचे फोटो, मयताचे स्केच व ईतर तांत्रीक तपासाच्या दृष्टीने अत्यंत क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करुन व मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह सुधाकर नारायण चिकटे यांचा असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपास करत मयताची पत्नी आशा सुधाकर चिकटे, तीचा भाऊ राजेश संतोष मोळवंडे व त्याची पत्नी अलका राजेश मोळवंडे, मुलगा युवराज राजश मोळवंडे यांना सदर गुन्ह्यात अटक करुन सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

  • वॉचमनची हत्या… 

तिसऱ्या गुन्ह्यात शहरातील मोंढा परिसरात वॉचमन म्हणून काम करणारे पाशा अफजल मुगल यांचा चोरट्यांनी हत्या करून,  एकूण 18 लाख 54 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. दरम्यान याप्रकरणी देखील गुन्हे शाखा आणि क्रांती चौक पोलिसांनी समांतार तपास करीत एकूण तीन आरोपींना मुंबई आणि धुळ्यातून ताब्यात घेतले होते. तसेच गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणला होता.

Aurangabad : जेवण केल्यानंतर बिल देण्याची वेळ येताच घातला राडा, हॉटेल मालकावर केला जीवघेणा हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here