बंगळुरू: निर्माणाधीन मेट्रोचा पिलर कोसळल्यानं मंगळवारी बंगळुरुत महिलेचा आणि तिच्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला. सकाळी साडे दहाच्या सुमारास एचबीआर लेआऊटच्या जवळ ही घटना घडली. जवळपास ४० फुटांचा, कित्येक टन वजनाचा पिलर अचानक कोसळला.

लोहिथ कुमार त्यांची पत्नी तेजस्विनी आणि दोन मुलांसह सकाळी घरातून निघाले. ऑफिसला जात असताना ते मुलांना नर्सरीत सोडणार होते. मुलांना नर्सरीत सोडून लोहिथ कुमार आणि तेजस्विनी आपापल्या ऑफिसला जाणार होते. त्याच सुमारास भीषण दुर्घटना घडली आणि लोहिथ यांनी पत्नी, मुलाला गमावलं.
पप्पांनी मम्मीला चाकू मारला, मग स्वत:ला मारुन घेतलं! चिमुकलीचा जबाब ऐकून पोलीस सुन्न
‘मी पत्नी आणि मुलांसह बाईकवरून जात होतो. ऑफिसला जाण्याआधी आम्ही त्यांना नर्सरीत सोडणार होतो. मात्र त्याआधीच ही दुर्घटना घडली. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे,’ असं कुमार म्हणाले. पिलर पडल्यानं तेजस्विनी आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
स्कूटीची चावी, हेल्मेट, बॅग घेऊन निघाली; पण कॉलेजला गेलीच नाही; तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं
दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. आम्ही त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र खूप रक्तस्राव झाला होता. रक्तदाब घटला होता. त्यामुळे त्यांना वाचवण्यात आम्हाला अपयश आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. हा प्रकार दुर्दैवी असून त्याची चौकशी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here