Teachers Constituency Elections Nagpur : गेल्या अनेक दिवसांपासून तळ्यात-मळ्यात केल्यानंतर आज सायंकाळी अखेर मुंबईत झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीचा निर्णय झाला. नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी कॉंग्रेसने आपला उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला. तसेच महाविकास आघाडीच्या समर्थनाने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला.

शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी 30 डिसेंबर रोजी नाकाडेंच्या नावाची घोषणा केली होती. नागपूर (Nagpur) शिक्षक आणि अमरावती (Amravati) पदवीधर या दोन्ही जागा आम्हीच लढवू, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. तेव्हा त्यांच्यावर कुणी विश्‍वास ठेवला नाही. पण आज त्यांनी केलेली घोषणा खरी ठरली. भाजप समर्थीत शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे उद्या दुपारी बारा वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या सह शहरातील सर्व भाजप आमदारांच्या  प्रमुख उपस्थितीत नामांकन दाखल करणार आहेत.

गंगाधर विश्वेश्वरराव नाकाडे यांनी नामांकन अर्ज सादर केला तेव्हा शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संघटक सुरेश साखरे, सह संघटक सतीश हरडे, जिल्हाप्रमुख राजू हरणे, युवा सेनेचे नागपूर जिल्हा युवा अधिकारी शरद सरोदे, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे, सुरेखा खोब्रागडे, सुशिला नायक तसेच युवा सेनेचे पंकज अहिरराव, प्रवीण अहिरराव यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षांपासून आमच्या उमेदवारांचे या क्षेत्रात मोठे काम आहे. गावोगावच्या शाळांमध्ये जाऊन शिक्षकांशी त्यांनी संपर्क केलेला आहे. शिक्षकांचे प्रश्‍न, मग ते राज्य पातळीवरचे असो किंवा जिल्हा पातळीवरचे, ते सोडवण्याचे काम आमच्या लोकांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिक्षक सेनेसोबत दोन्ही मतदारसंघातील शिक्षक शक्तीनिशी उभे राहतील. महाविकास आघाडी मिळूनच हे उमेदवार ठरलेले आहेत आणि आम्ही एकत्र मिळूनच ही निवडणूक लढवणार आहोत, असे अभ्यंकर यांनी सांगितले. या निवडणुकीत आम्हालाच यश मिळेल, याची खात्री अभ्यंकर यांनी दिली.

news reels

गाणार उद्या दुपारी करणार अर्ज दाखल 

भाजपकडून शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून नागो गाणार (Nago Ganar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तसेच गाणार उद्या, गुरुवारी (12 जानेवारी) दुपारी बारा वाजण्यापूर्वी अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांच्या प्रतिनिधीने ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली.

ही बातमी देखील वाचा…

नागो गाणार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी, उद्या भरणार अर्ज; 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here