या प्रकरणी अल्पवयीन तरुणीने आई-वडिलांसोबत कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला होता. मात्र, पोलीस तपासात या तरुणीचे पितळ उघडे पडले. अल्पवयीन तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर कापूरबावडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तरुणीच्या जुना अल्पवयीन प्रियकराला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याने दागिने कुणाला विकले हे सांगण्यात असमर्थ ठरला. पोलिसांनी सीसीटिव्ही आणि तांत्रिक यंत्रणांच्या आधारे तपास केला असता त्यांच्या लक्षात आले की अल्पवयीन तरुण हा दुकानात गेलाच नाही.
पोलिसांना अपलवयीन तरुण निर्दोष असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलत तरुणीला विश्वासात घेत तिची चौकशी सुरू केली. त्यावेळी या तरुणीने आपण केलेला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला. तरुणीने तिचा प्रियकर अलोक राऊत याला वाचविण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे पोलिसांना सांगितले. सगळ्या गुन्ह्याचा उलघडा होताच पोलिसांनी तरुणीच्या परिसरात राहणाऱ्या अलोक राऊत याला आझादनगर मानपाडा येथून ताब्यात घेतले. त्याने दागिने कुठे विकली याचा तपास केला असता त्याने हे दागिने भिवंडी काल्हेर इथे विकल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी भिवंडी काल्हेर येथील ज्वेलर्स दुकानदार बासुकी सुरेंद्र वर्मा (३२) याला कापूरबावडी पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.
आरोपी अलोक आणि अल्पवयीन मुलगी यांचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी हा प्लॅन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कापूरबावडी पोलिसांनी अल्पवयीन तरुणीला बाल न्यायालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया केली असून आरोपी अलोक राऊत आणि ज्वेलर्स मालक बासुकी सुरेंद्र वर्मा या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास कापूरबावडी पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी सांगितले.