पुणे : पुण्यात अलीकडे कोयता गँग दहशद माजवत असताना कुठे तरी रोड रोमियोचा प्रकार ही दिवसांदिवस वाढत आहे. मात्र, या रोमियोची मर्यादाही तेवढ्या पुरती राहिली नसून आता एक हवस बनत चाली आहे. असाच एक प्रकार पुण्यातील फुरसुंगी चौकात घडला. एका विधवा महिलेला एकाच कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्याने महिन्यातून ३ वेळा भेटण्याची अट घालत धमकी दिली. अन्यथा तुझ्या मुलाला मारून टाकीन आणि तुझ्या नातेवाईकांसमोर तुझी बदनामी करेन आणि तुला उचलून घेऊन जाईल अशी धमकी देणाऱ्या एकावर हाडपसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या ओळखीतून काळभोर याने महिलेला ‘तू माझ्यासोबत प्रेम करणार नसशील, तर मी तुझ्या घरी येऊन नातेवाईकांना सांगेन व तुझी बदनामी करेल,’ अशी धमकी दिली. फिर्यादीला जबरदस्तीने मिठी मारून लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच, फिर्यादीच्या कानाखाली मारून तिला शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार २०१८ ते २८ डिसेंबर २०२२ दरम्यान घडला. या प्रकरणी काळभोर याला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक उमरे यांनी सांगितले.