नवी दिल्ली : जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे त्याचा परिणाम सरकारी तेल कंपन्यांवरही पाहायला मिळतो. गुरुवारी सकाळी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये हलके बदल झाल्याचं पाहायला मिळालं. आज अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये इंधनांचे दर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. पण दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर आज स्थिर आहेत.

चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर…

– दिल्लीमध्ये पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लीटर

– मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लीटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लीटर

– कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लीटर

भारती एअरटेलचे शेअर धडाम! गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं, खरेदीची संधी की नाही; एका क्लिकवर समजून घ्या
दररोज सकाळी ६ वाजता बदलतात भाव…

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये एक्साइज ड्यूटी, डिलर कमिशन, व्हॅट आणि इतर दर जोडून रोजचा भाव ठरवला जातो.

कसे जाणून घेणार तुमच्या शहरातले दर…(How to check diesel petrol price daily).

इंधनांचे दर तुम्ही रोज SMS द्वारेही मिळवू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर RSP आणि तुमच्या शहराचा कोड टाइप करून ९२२४९९२२४९ वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकता. जर तुम्ही BPCL ग्राहक असाल तर RSP लिहून तुमच्या शहर कोड ९२२३११२२२२ टाइप करून माहिती मिळवू शकता आणि तुम्ही जर HPCL ग्राहक असाल तर HPPprice आणि शहर कोड ९२२२२०११२२ वर पाठवून दर जाणून घेऊ शकता.

गौतम अदानींच्या फक्त नावामुळे शेअर बनला रॉकेट, तीन दिवसांत १५ टक्क्यांची झेप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here