Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील मातब्बर नेते, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागलमधील तसेच पुण्यातील निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. छापेमारी करण्यासाठी बुधवारी पहाटेच दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त घेऊन दाखल झाली होती. यामुळे स्थानिक पोलिसांना याबाबत काहीच कल्पना नव्हती.   

मात्र, कोल्हापुरात ईडीचे पथक (Hasan Mushrif ED Raid) बुधवारी सकाळी दाखल झाल्यानंतर भलताच प्रसंग घडला. कोल्हापुरातील सासने मैदान परिसरात हसन मुश्रीफ यांच्या कन्या निलोफर मनगोळे राहतात. ईडीने त्यांच्या घरावरही छापा टाकला. मात्र, भलत्याच आणि प्रतिष्ठित घरात गेल्याने पहाटेच घाम फुटायची वेळ आली. सासने मैदान परिसरात असणाऱ्या त्यांच्या मुलीच्या घरावरही छापा टाकण्यासाठी ईडी पथक गेले असताना मुश्रीफांच्या मुलीच्या घराऐवजी दुसऱ्याच घरावर छापा टाकल्याने खळबळ उडाली. मात्र, अधिकाऱ्यांना चूक लक्षात येताच निलोफर मनगोळे यांच्या घराकडे गेले. 

सासने मैदान परिसरात एका बड्या घरात हे अधिकारी गेले. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणाचा अंदाज आला नाही. मात्र, चुकून ज्यांच्या घरावर छापा टाकला त्यांना कोणताही त्रास न देता अधिकारी निलोफर यांच्या घरी गेले. निलोफर मनगोळे यांच्या घराबाहेरही  प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासून या ठिकाणी चौकशी झाली. मुश्रीफ यांच्या जावयांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. चौकशी करत असताना निलोफर यांच्या घराकडे येणाऱ्यांना प्रतिबंध केला जात होता. 

news reels

तीन ठिकाणी एकावेळी कारवाई 

दरम्यान, मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले. शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपाच्या मागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्जुज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली. 

हसन मुश्रीफांवर ईडीची दुसऱ्यांदा छापेमारी

दुसरीकडे दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आल्याने कोल्हापुरात आणि कागलमधील गैबी चौकात हसन मुश्रीफ समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा या छापेमारीचा निषेध केला. त्यांनी भाजपसह केंद्रीय यंत्रणांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणेचा गैरवापर होत वापर होत असल्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांचा पुतळाही यावेळी जाळण्यात आला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here