Pune PMC WhatsApp ChatBot Services : पुणे महापालिकेने सुरु (PMC) केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट या सेवेत आता नागरिकांशी निगडीत (WhatsApp) 19 विभागातील 80 सेवा उपलब्ध केल्या आहेत. या प्रकारची व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. महापालिकेच्या विभागांमार्फत अनेक सेवासुविधा दिल्या जातात. यामध्ये नागरी सेवा सुविधा, विभिन्न विभागांनी बिले भरणे, परवाना काढणे परवानगी घेणे, विविध दाखले ना हरकत प्रमाणपत्र अशी अनेक प्रकारची माहिती नागरिकांना सहजपणे या व्हॉट्सअप चॅट बॉट सेवेच्या माध्यमातून चोवीस तास मिळू शकेल. नागरिकांना या सुविधा पुणे महापालिकेचा 8888251001 या व्हॉट्सअॅप नंबरवर उपलब्ध असेल. 

पुणे महानगरपालिका एका क्लिकवर माहिती देणारी भारतातील प्रथम महापालिका ठरणार आहे. त्यामध्ये विविध 19 विभागाच्या सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारची मिळकत कर, पाणीपट्टी बिल, फेरीवाला देयक, जाहिरात फलक याची बिले भरता येतील. तसेच कुत्रा पाळणे परवाना, फांद्या छाटणी परवानगी, झाड तोडणे परवानगी, जाहिरात फलक परवाना, नवीन नळजोडणी अर्ज आदी परवाने मिळू शकतील. जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मिळकत कर ना हरकत प्रमाणपत्र, मिळकत हस्तांतरण, वारसाहक्क हस्तांतरण आदी प्रमाणपत्रे मिळू शकतील. या क्रमांकावर तक्रार दाखल करण्याची सोय केली आहे. तक्रारीची सद्यस्थिती पाहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सद्यस्थितीत नागरिकांकरता नमूद तक्रारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

विविध योजनांची माहिती उपलब्ध

महापालिकेकडून राबविल्या जाणार्‍या शहरी गरीब आरोग्य योजना, पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना,पंतप्रधान आवास योजना, प्राणी दत्तक, खेळाडू दत्तक, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, अपंग कल्याणकारी योजना, महिला बालकल्याण योजना, महिला सक्षमीकरण योजना, युवक कल्याणकारी योजनांचीही माहिती दिली गेली आहे.

व्हॉट्सअॅप सेवा देणारी भारतातील पहिलीच महापालिका 

व्हॉट्सअॅप देणारी भारतातील प्रथम महापालिका ठरली आहे. आतापर्यंत भारतात एकाही महापालिकेने आपल्या सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरु केल्या आहेत. मात्र आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर कोणत्याही महापालिकेने सेवा उपलब्ध करुन दिली नाही आहे. त्यामुळे पुणे महापालिका व्हॉट्सअॅप सेवा देणारी भारतातील प्रथम महापालिका ठरली आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक शहरातील महापालिका व्हॉट्सअॅपवर सेवा उपलब्ध करतील आणि नागरिकांचं काम हलकं करतील अशी अपेक्षा आहे. 

news reels

संबंधित बातमी-

Pune News : पक्के पुणेकर! सोसायटीची भिंत विनापरवाना रंगवली; पुणेकरांनी पालिकेलाच पाठवलं लाखोंचं बिल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here