परभणी: बालुशाहीचे पैसे मागितल्याने गाडा चालकाला मारहाण केल्याची घटना परभणीतील सोनपेठमध्ये घडली आहे. समोसे खाण्यासाठी दोघेजण गाड्यावर आले. त्यांनी गाडा चालकाकडे समोस्याची मागणी केली. मात्र त्यानंतर बालुशाही द्या असे म्हणून बालुशाही खाल्ली. गाडा चालकांनी पैसे मागितल्याचा राग मनात धरून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. सोनपेठ शहरातील बाजारपेठेमध्ये घडली आहे. याप्रकरणी गंगाधर दत्ता डुकरे यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरोधात सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील वरकडवडी येथील गंगाधर डुकरे हे सोनपेठ येथे समोस्याचा गाडा चालवतात. त्यांनी १० जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे आपला गाडा सुरू केला असता दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर पानखडे आणि ऋषिकेश मोरे हे दोघेजण त्या ठिकाणी आले. त्यांनी गंगाधर डुकरे यांच्याकडे समोस्याची मागणी केली. मात्र प्रत्यक्षात बालुशाही खाल्ली आणि ५० रुपये दिले. त्यामुळे गंगाधर डुकरे ४० रुपये परत देत होते.
आम्ही बाईकवरून जात होतो, क्षणार्धात सगळं संपलं; पतीनं डोळ्यांदेखत पाहिला पत्नी, लेकाचा अंत
डुकरे ४० रुपये परत देत असताना ऋषिकेश मोरे आणि सिद्धेश्वर पानखडेंनी त्यांना शिवीगाळ सुरू केली. तू आमच्याकडे पैसे का मागतो? अशी विचारणा करत वाद घातला. ऋषिकेश मोरेने हातातील चाकू डुकरे यांच्या बरगाडीत मारून त्यांना जखमी केले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सदरचे भांडण सोडून गंगाधर डुकरे यांना उपचारासाठी सोनपेठ येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी गंगाधर डुकरे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात सोनपेठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here