Pune Crime news : शाळकरी मुलाने जुन्या भांडणातून (crime) 15 वर्षांचा मुलगा आणि त्याचा (pune) मित्र अशा दोघांवर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील नगर रोडवरील वडगाव शेरी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी चंदननगरमधील बोराटे वस्तीत राहणाऱ्या एका पालकाने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गलांडे नगरमध्ये राहतात. त्यांच्या मुलाचं एका मुलाशी भांडण झालं होतं. तक्रारदार यांचा मुलगा परिसरात असलेल्या मदर तेरेसा शाळेतून चालत घरी जात होते. बस स्टॉपवर बसले असताना शाळकरी मुलगा आणि त्याचे तीन मित्र या बस स्टॉपवर आले. त्यावेळी त्या मुलांनी तक्रारदाराच्या मुलाना शिवीगाळ केली आणि त्याच्यावर थेट ब्लेडने हल्ला केला. यात मुलगा जखमी झाला. त्यानंतर त्याला पट्ट्याने मारहाण केली. हा सगळा प्रकार वडील बघत होते. त्यांनी मुलांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलं जुमानत नव्हते. शेवटी वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. 

क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या वादातून हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ

पुण्यात सातत्याने गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्याल क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या वादातून हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. सुरुवातील तरुण गुन्हेगारांचा या घटनांमध्ये समावेश होता. मात्र आता शाळकरी अल्पवयीन मुलांचा देखील समावेश वाढत आहे. पुण्यात गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी अशीच हल्ला केल्याची घटना समोर आली होती. रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाने ‘भाई’ न म्हटल्याने गुंडांच्या टोळीने जीवे मारणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या टोळीने तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन त्याला जखमी केले होते. पुण्यातील येरवडा परिसरात ही घटना खडकीतील शिवाजी पुतळ्याच्या परिसरात घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती आणि चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. 36 वर्षीय संतोष साळवे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन संकेत मारे ऊर्फ मेड्या, प्रफुल्ल ऊर्फ कान्या सोनवणे, सोनू मारे या तिघांना अटक केली होती. त्यांच्यासोबतच महेश सुरेश पवार यांच्या अशा चौघांवर खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता. 

पुण्यात गुन्हेगारीत वाढ

पुण्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहे. पुण्यात सध्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचं बघायला मिळत आहे. त्यात शहरात चुहा गॅंग आणि कोयता गॅंग चांगल्याच सक्रिय आहेत. कोयता गॅंगने तर शहरात धुमाकूळ घातला आहे. यात अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. 

news reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here