शांताबाई पवार असं या आजींचं नाव आहे. हा हडपसर येथे राहतात. त्यांच्या मुलांचा मृत्यू झाल्यानंतर नातवांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. काबाड कष्ट करून त्यां नातवांचा सांभाळ करत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून करोनाचे संकट आहे. लॉकडाऊनमुळं हातावर पोट असलेल्या या कुटुंबाची उपासमारी सुरू आहे. शेवटी लॉकडाऊन उठल्यावर न खचता पदर खोचून आजी पुन्हा उभ्या राहिल्या. रस्त्यावर काठी फिरवण्याची कला सादर करण्यास सुरुवात. अनेकांनी या आजीला सोशल मीडियावर व्हायरल केल्याने अवघ्या दोन तीन दिवसातच त्या सोशल मीडियावर स्टार झाल्या. अगदी अभिनेते आणि अधिकाऱ्यांनीही त्यांची स्तुती करत त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. काही संस्थांनीही आजींना मदतीचा हात दिला आहे.
काल दिवसभर सोशल मीडियावर आजींचा व्हिडिओ व्हायरल झाला. आज अनेकांनी आजींची भेट घेऊन विचारपूस केली आणि त्यांना किराणा तसेच ताडपत्री व इतर साहित्याची मदत पोहोचवली. आजींना कसलीही अडचण येणार नाही, यासाठी सातत्याने संपर्कात राहणार असल्याचंही जागृती ग्रुपचे राज देशमुख यांनी सांगितले.
आजींनी मानले आभार
सोशल मीडिया आणि प्रत्यक्षात मिळालेल्या कौतुकानं आजी भारावून गेल्या आहेत. ‘करोनाच्या संकटात बाहेर पडू नको असं सगळे मला सांगत होते पण मला माझी लेकर जगवायची होती. मला बाहेर पडणं भागचं होतं. मी बाहेर पडले आणि माझ्या केसालाही धक्का लागला नाहीये. माझा व्हिडिओ सगळीकडे पोहोचला आणि माझे मदतीसाठी अनेक जण पुढे आले. ज्यांनी मला मदत केली त्यांचे मी आभार मानते,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचाः
आजीच्या मदतीसाठी रितेश सरसावला आहे. त्याने ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना आजीचा संपर्क कोणाला कुठे होतो का विचारले. अवघ्या थोड्या वेळातच रितेशला आजींचा संपर्क मिळाला. आता रितेश आजीला कोणत्या पद्धतीने मदत करतो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times