संतोषनं वार केल्यानंतर पुढे प्रकाशच्या आयुष्यात आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण झाल्या. त्यासाठी संतोषनं केलेला वारच जबाबदार असल्याचं प्रकाशला वाटत होतं. प्रकाशला लग्नानंतर मुलं झाली नाहीत. त्यासाठीही संतोषनं केलेला वारच जबाबदार असल्याचं प्रकाशला वाटत होतं. दोन वर्षांपूर्वी प्रकाशच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रकाशला एकटं वाटू लागलं. गेल्या वर्षभरापासून प्रकाश संतोषला मारण्याचा कट रचत होता.
प्रकाशनं संतोषची हत्या करण्यासाठी चाकू खरेदी केला. प्रकाश पेंटिंगचं काम करतो. तो दररोज सँडपेपरनं चाकूला धार द्यायचा. रविवारी सकाळी दोघे आमनेसामने आले. त्यावेळी संतोष घरी एकटा होता. संतोष दुपारी झोपला असल्याची संधी साधत प्रकाशनं त्याची हत्या केली. संतोषच्या शरीरावर तीन गंभीर जखमा होत्या. त्याच्या शरीरातील अवयव बाहेर आले होते. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्रकाशला पोलिसांनी पळून जाण्याआधीच घटनास्थळावरून अटक केली. त्यानंतर त्याला कोट्टारक्कारा न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली.