दिल्ली: दिल्ली पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. दोन्ही चोरटे गुन्हा करण्यापूर्वी दर्ग्यावर जाऊन आशीर्वाद घ्यायचे. पोलिसांना चोरट्यांची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जाळं रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडे बंदूक, जिवंत काडतुसं आणि चोरी केलेली मारुती व्हॅन सापडली.

आरोपींनी पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांची नावं समजली आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून छापासत्र सुरू आहे. ७ जानेवारीला दोन तरुण वाहन चोरी करण्यासाठी वजिराबाद परिसरात येणार असल्याची माहिती तिमारपूर पोलीस ठाण्याचे एएसआय संजीव कुमार यांना मिळाली. यानंतर पोलिसांचं पथक वजिराबाद उड्डाणपुलाखाली पोहोचलं. काही वेळातच दोन तरुण मारुती व्हॅन घेऊन तिथे आले. पोलीस आधीपासूनच तिथे सापळा रचून तैनात होते.
‘मा’ अक्षराचा खेळ जीवघेणा ठरला; १५ वर्षांपूर्वीच्या खेळातून मित्राचा ‘गेम’; निर्घृणपणे संपवलं
व्हॅनमधून उतरताच दोन्ही तरुण तिथे असलेल्या नौ गज पीर दर्ग्यात माथा टेकण्यासाठी गेले. यादरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याजवळ एक ऑटोमॅटिक गन आणि सहा जिवंत काडतुसं सापडली. गुलजार अहमद अन्सारी आणि मोहम्मद तारीक अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दोघांकडे व्हॅनची कागदपत्रं मागितली. तेव्हा ती व्हॅनदेखील चोरीची असल्याचं समोर आलं.

पोलिसांनी दोघांना बंदुकीविषयी विचारलं. दोन महिन्यांपूर्वी २० हजारांत बंदूक खरेदी केली होती. हाफिज नावाच्या व्यक्तीकडून बंदूक खरेदी करण्यात आली होती. हाफिज भजनपुराचा रहिवासी आहे. चोरी आणि लूटमार करताना दोघे बंदुकीचा वापर करायचे. हिलाल आणि संजय अशी त्यांच्या साथीदारांची नावं आहेत. त्यांच्या सहकार्यानं दोघे लूटमार करायचे. दिल्लीत झालेल्या अनेक सोनसाखळी चोऱ्यांमध्ये त्यांचा हात आहे.
आम्ही बाईकवरून जात होतो, क्षणार्धात सगळं संपलं; पतीनं डोळ्यांदेखत पाहिला पत्नी, लेकाचा अंत
आरोपींकडे पोलिसांना एक मास्टर कीदेखील सापडली. तिच्याच मदतीनं दोघे वाहन चोरी करायचे. तिमारपूरमध्ये ते चोरीच्या हेतूनेच आले होते. मात्र त्याआघीच ते पकडले गेले. गुन्हा करण्यापूर्वी आरोपी दर्ग्याह जाऊन माथा टेकवून आशीर्वाद घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दोघांच्या साथीदारांना पकडण्यासाठी छापे टाकले. मात्र ते पळून गेले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here