संजय गौतम असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. संजयच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात हत्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. संजयचे वडील रामदास गौतम मथुराचे रहिवासी असून ते सिंचन विभागात कार्यरत आहेत. अलीगढ जिल्ह्यातील खैरगावात ते सेवा बजावत होते. त्यानंतर पलवलमध्ये त्यांची बदली झाली. तेव्हापासून रामदास गौतम मुलांसह पलवलच्या कानुनगो मोहल्ल्यात वास्तव्यास होते.
रामदास गौतम यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. सर्व मुलं विवाहित आहेत. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा संजय गौतम उर्फ गुड्डू एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास तो घरातून कामासाठी निघाला. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास पलवलच्या हुड्डा सेक्टर १२ मध्ये संजय मृतावस्थेत आढळून आला. अज्ञात व्यक्तीनं गोळी झाडून त्याची हत्या केली होती.
पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. संजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. संजय फूड डिलिव्हरी कंपनीत काम करायचा. पोलिसांनी संजयची पत्नी, त्याचं कुटुंब आणि सहकाऱ्यांकडे चौकशी केली. पोलिसांना पत्नीवर संशय आला. तिची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत तिनं सत्य सांगितलं. शेजारी राहणाऱ्या गोपाळसोबत प्रेमसंबंध असल्यानं, त्यात पती अडथळा ठरत असल्यानं संजयची हत्या केल्याची कबुली तिनं दिली.
आरोपी पत्नी पारुलनं संजयला कॉल करून संजयला त्याचा ठावठिकाणा वितारला. त्याच्या लोकेशनची माहिती गोपाळला दिली. त्यावेळी संजय काम आटोपून घरी परतत होता. गोपाळ त्यानं गाठलं आणि लिफ्ट मागितली. संजय जिमखाना क्लबपर्यंत लिफ्ट देण्यास तयार झाला. बाईक क्लबजवळ पोहोचताच गोपाळनं संजयची गोळी झाडून हत्या केली. पारुलनं गुन्हा कबूल केल्यानंतर गोपाललादेखील अटक करण्यात आली.