Namita Thapar Shark Tank India : शार्क टँक इंडियाचा (Shark tank india season 2) दुसरा सीझन सुरु झाला आहे. लेन्सकार्ट (Lenskart) चे सीईओ पियुष बंसल, आणि शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ विनीता सिंग हे नव्या सीझनसाठी सज्ज झाले आहेत. यात पुण्याची लेक एमक्योर फार्माच्या इंडियाच्या (Namita Thapar) नमिता थापरचा यांचाही समावेश आहे. मागील सीझन चांगला गाजला होता. त्यानंतर आता पुन्हा नव्या उद्योजकांना भेटण्यासाठी, त्यांच्या कल्पना ऐकून घेण्यासाठी सगळे तयार झाले आहेत. 

पुण्याची लेक असणाऱ्या शार्क नमिता थापर यांची संपत्ती बाकी शार्कपेक्षा सगळ्यात जास्त आहे. काही दिवसांपूर्वीच फोर्ब्सच्या (Forbes) 20 आशियाई उद्योजक महिलांच्या यादीत त्यांचा समावेश झाला होता. त्याचं राहणीमान कसं आहे आणि त्यांची संपत्ती नेमकी किती आहे. यासंदर्भात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 

कोण आहेत नमिता थापर?

नमिता थापर या एमक्योर फार्माच्या इंडियाच्या (Emcure Farms India)  कार्यकारी संचालक आहेत. त्यांचा जन्म पुण्यात झाला आहे. पुण्यात महविद्यालयीन शिक्षण घेतलं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियातून त्यांनी चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी फुका स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं आहे. कोरोनाच्या काळात महिलांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांनी नमितासोबत अनकंडिशन युवरसेल्फ नावाचा यूट्यूबवर टॉक शो सुरु केला. इकॉनॉमिक टाइम्स अंडर 40 अवॉर्ड, बार्कले हुरुन नेक्स्ट जेन लीडर अवॉर्ड, इकॉनॉमिक टाइम्स 2017 वुमन अहेड अवॉर्ड, असे अनेक अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत.

नमिता थापर यांची संपत्ती

थापर यांची एकूण संपत्ती सुमारे 600 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. भारतातील अग्रगण्य फार्मा कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या त्या कार्यकारी संचालक आहेत. एमक्योर टॅब्लेट, कॅप्सूल आणि इंजेक्टेबल्ससह बायोफार्मास्युटिकल उत्पादन करते. त्याचं मुख्य ऑफिस पुण्यात आहे. 1981 मध्ये एमक्योर फार्मा ही कंपनी सुरु झाली होती. त्यानंतर कंपनीने भारतातच नाही तर जगभर आपलं नाव केलं. वैद्यकीय क्षेत्रात या कंपनीचं मोठं नाव आहे. भारताबाहेर किमान 70 देशांमध्ये त्याच्या उत्पादकांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. या कंपनीची एकूण कर्मचारी संख्या 11,000 पेक्षा जास्त आहे.

news reels

दोन कोटींची कार…

जवळपास सर्व शार्क लक्झरी कार चालवतात. अनुपम मित्तल यांच्याकडे सुमारे 4 कोटी रुपयांची लॅम्बॉर्गिनी हुरॅकन आहे, तर अमन गुप्ता आणि विनीता सिंग यांच्याकडे अनुक्रमे 55 लाख रुपयांची BMW X1 आणि 80 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ GL-क्लास आहे. तर नमिता थापर या BMW X7 चालवतात ज्याची किंमत 2 कोटी रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here