Nashik MLC Election:  विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवार बदलाबाबत माहिती घेऊन भाष्य करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे डॉ. सुधीर तांबेच होते. तर, सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार असल्याचे स्पष्ट वक्तव्य नाना पटोले यांनी अमरावतीमध्ये केले.

नाना पटोले यांनी म्हटले की, पक्षाकडूना डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवार बदलाबाबत आपल्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असेही नाना पटोले यांनी म्हटले. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारात अचानक बदल का करण्यात आला, याची आपल्याला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती घेऊन भाष्य करण्यात येईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. 

या सगळ्या प्रकरणाची पक्षीय पातळीवर चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर या मुद्यावर अधिक प्रतिक्रिया देऊ असेही नाना पटोले यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज का भरला नाही, याची माहिती घेतली जात आहे. सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी काय करावं, हे त्यांनीच ठरवावं असेही पटोले यांनी म्हटले. उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेताना विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा झाली असे समजते. त्यामुळे नेमका हा निर्णय का घ्यावा लागला, त्याची कारणे काय, याबद्दल चर्चा करणार असल्याचेही पटोले यांनी म्हटले.

नाशिकमध्ये उमेदवार बदलण्यात आला याची माहिती माध्यमांच्या वृत्तातून कळली असल्याचे पटोले यांनी म्हटले. त्यामुळे आता उमेदवार निवडीबाबत प्रदेशाध्यक्षांनाच अंधारात ठेवण्यात आले होते का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

news reels

 

Nana Patole on Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे अपक्ष, त्यांनी ठरवावं काय करायचं : नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here