९ जानेवारीला चोरी करण्याची योजना आखण्यात आली. कारण त्या दिवशी परिसरातील बरीचशी दुकानं बंद होती. चोरानं पूर्ण योजना आखली होती. दुपारच्या सुमारास तो बोगद्यातून दुकानात शिरला. त्यानं इथेतिथे पाहिलं आणि थेट तिजोरीच्या दिशेनं गेला. त्यानं काही वस्तूही चोरल्या. त्याचवेळी काही कामास्तव मालिक दुकानात पोहोचला. मालकानं चोरट्याला रंगेहात पकडलं आणि त्याला बेदम मारलं. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. ठाणे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.
घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यात चोर बोगद्यातून आत शिरुन सामान चोरताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोगदा तयार करून चोरी करण्याची कल्पना काही नवी नाही. एप्रिल २०२० मध्ये मुंबईत चोरट्यांनी लॉकडाऊनचा फायदा घेत बोगदा तयार करून दागिन्यांच्या दुकानात चोरी केली होती. मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या अंधेरीत ही घटना घडली होती. त्याआधी २०१७ मध्ये एस व्ही रोड परिसरात चोरट्यांनी २५ दिवसांत ६ फूट लांब बोगदा तयार केला होता. मात्र बोगदा तयार करताना होणारा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी आरोपींना अटक केली.
Home Maharashtra thief arrested, ज्वेलरी शॉपच्या बाजूनं दुकान भाड्यानं घेतलं, बोगदा खणून घुसला; पण...